मुंबई, 29 मार्च : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. तिसरी वनडे संपल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातली सीरिज संपली. टीम इंडियाने टेस्ट, टी-20 आणि वनडे सीरिजमध्ये इंग्लंडचा पराभव केला. यानंतर आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यात पहिला सामना होणार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 वेळा विजय मिळवण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे.
स्टार स्पोर्ट्सने आयपीएलच्या या मोसमाआधी मुंबई इंडियन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सहावी ट्रॉफी जिंकण्याबाबत बोलत आहे. 'एक, दोन, तीन, चार, पाच, आणखी एक पाहिजे. लोभाला मित्र बनवा आणि जिंकण्याची भूक वाढवा, हा आहे भारताचा मंत्र,' असं रोहित या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.
Jeet ki bhookh + lalach se dosti = Unstoppable combo! Right, @ImRo45? 😉 Will this #IndiaKaApnaMantra help Hitman keep the winning habit going this season too?#VIVOIPL 2021 | Apr 9 | Broadcast starts 6 PM & Match starts 7:30 PM | Star Sports & Disney+Hotstar VIP pic.twitter.com/ylhoPGSgQc
— Star Sports (@StarSportsIndia) March 29, 2021
आयपीएलचा मागचा मोसम युएईमध्ये खेळवण्यात आला होता. फायनलमध्ये मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली मुंबईने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
मुंबई इंडियन्सची टीम
रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरान पोलार्ड, कृणाल पंड्या, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेन्ट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, एडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, पियुष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंह, जेम्स नीशम और अर्जुन तेंडुलकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma