IPL 2021, MI vs SRH : बोल्ट-चहरचा हैदराबादला करंट! मुंबईचा सलग दुसरा विजय

IPL 2021, MI vs SRH : बोल्ट-चहरचा हैदराबादला करंट! मुंबईचा सलग दुसरा विजय

आपल्या भेदक बॉलिंगच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएलच्या या मोसमातला धमाकेदार विजय मिळवला आहे. मुंबईने सनरायजर्स हैदराबादचा (SRH) 13 रनने पराभव केला आहे. 151 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा 137 रनवर ऑल आऊट झाला.

  • Share this:

चेन्नई, 17 एप्रिल : आपल्या भेदक बॉलिंगच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएलच्या या मोसमातला धमाकेदार विजय मिळवला आहे. मुंबईने सनरायजर्स हैदराबादचा (SRH) 13 रनने पराभव केला आहे. 151 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा 137 रनवर ऑल आऊट झाला. ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) आणि राहुल चहर (Rahul Chahar) यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर बुमराह आणि कृणाल पांड्याला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. मुंबईच्या बॉलरनी या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली असली, तरी हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) केलेल्या दोन भन्नाट रन आऊटमुळे सामना मुंबईच्या बाजूने झुकला. हार्दिकने डेव्हिड वॉर्नर आणि अब्दुल समद याला डायरेक्ट हिट मारून रन आऊट केलं. हैदराबादकडून जॉनी बेयरस्टोने 22 बॉलमध्ये 43 रनची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने 36 आणि विजय शंकरने 28 रन केले. 

कायरन पोलार्डने (Kieron Pollard) शेवटच्या काही ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने हैदराबादला (Mumbai Indians vs SRH) विजयासाठी 151 रनचं आव्हान दिलं. पोलार्डने शेवटच्या ओव्हरच्या अंतिम दोन बॉलवर भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) दोन सिक्स मारल्यामुळे मुंबईला 150 रनपर्यंत मजल मारता आली. पोलार्डने 22 बॉलमध्ये नाबाद 35 रनची खेळी केली. टॉस जिंकून पहिले बॅटिंगला आलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली. क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात 6.3 ओव्हरमध्ये 55 रनची पार्टनरशीप झाली. रोहित शर्मा 25 बॉलमध्ये 32 रन करुन तर डिकॉक 39 बॉलमध्ये 40 रन करुन आऊट झाला. यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 10 रनवर तर इशान किशन (Ishan Kishan) 12 रन करुन आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 7 रन माघारी परतले. हैदराबादकडून विजय शंकर (Vijay Shankar) आणि मुजीब उर रहमानला (Mujeeb UR Rahaman) प्रत्येकी 2-2 विकेट मिळवल्या तर खलील अहमदला एक विकेट घेण्यात यश आलं.

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमात बहुतेक टीमचे कॅप्टन हे टॉस जिंकून फिल्डिंग घेत असताना रोहितने मात्र उलटा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. चेन्नईची संथ खेळपट्टी बघता इकडे आव्हानाचा पाठलाग करणं कठीण जात असल्यामुळे रोहितने पहिले बॅटिंग घेतली आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरला. या सामन्यात मुंबईने त्यांच्या टीममध्ये एक बदल केला. मार्को जेनसनऐवजी न्यूझीलंडचा फास्ट बॉलर एडम मिल्ने याला संधी देण्यात आली. तर हैदराबादने टीममध्ये तब्बल चार बदल केले. हैदराबादच्या टीममधून ऋद्धीमान साहा, जेसन होल्डर, टी नटराजन आणि शाहबाज अहमद बाहेर होते, त्यांच्याऐवजी विराट सिंग, अभिषेक शर्मा, मुजीब उर रहमान आणि खलील अहमद यांना संधी देण्यात आली.

Published by: Shreyas
First published: April 17, 2021, 7:12 PM IST

ताज्या बातम्या