IPL 2021, MI vs KKR : कोलकात्याने हातातली मॅच घालवली, मुंबईचा रोमांचक विजय

IPL 2021, MI vs KKR : कोलकात्याने हातातली मॅच घालवली, मुंबईचा रोमांचक विजय

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमात मुंबईने (Mumbai Indians) त्यांचा पहिला विजय नोंदवला आहे. कोलकात्याविरुद्धच्या (KKR) सामन्यात मुंबई इंडियन्सचा 10 रनने विजय झाला आहे.

  • Share this:

चेन्नई, 13 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमात मुंबईने (Mumbai Indians) त्यांचा पहिला विजय नोंदवला आहे. कोलकात्याविरुद्धच्या (KKR) सामन्यात मुंबई इंडियन्सचा 10 रनने विजय झाला आहे. 12 व्या ओव्हरमध्येच कोलकात्याने 100 रनचा टप्पा ओलांडला होता, पण 12.5 ओव्हरला कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन आऊट झाला आणि मुंबईने मॅचमध्ये पुनरागमन केलं. मुंबईने ठेवलेल्या 153 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 142 पर्यंतच मजल मारता आली. मुंबईकडून राहुल चहरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर ट्रेन्ट बोल्टला 2 विकेट मिळाल्या. कृणाल पांड्याला 1 विकेट घेण्यात यश आलं. कोलकात्याकडून नितीश राणाने सर्वाधिक 57 रन केले, तर नितीश राणाने 33 रन केले. या दोन्ही ओपनरनी 8.5 ओव्हरमध्ये 72 रनची पार्टनरशीप केली.

त्याआधी कोलकात्याविरुद्धच्या (KKR) सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईचा 20 ओव्हरमध्ये 152 रनवर ऑल आऊट झाला. लागोपाठ दुसऱ्या सामन्यात विरोधी टीमच्या बॉलरने मुंबईच्या 5 विकेट घेतल्या. मागच्या सामन्यात हर्षल पटेलने मुंबईच्या 5 खेळाडूंना माघारी पाठवल्यानंतर यंदा आंद्रे रसेलने (Andre Russel) अशीच कामगिरी केली. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 56 रन केल्या, तर कर्णधार रोहित शर्माला 43 रन करता आल्या. रसेलच्या 5 विकेटशिवाय पॅट कमिन्सला 2 तर वरुण चक्रवर्ती, शाकीब अल हसन आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेही आपण टॉस जिंकला असता तर फिल्डिंगच केली असती, असं वक्तव्य केलं. या सामन्यासाठी मुंबईने टीममध्ये एक बदल केला. क्रिस लीनच्याऐवजी (Chris Lynn) क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेल्या क्विंटन डिकॉकचं (Quinton De Kock) टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

आयपीएल (IPL) इतिहासात कायमच मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्सवर वरचढ राहिली आहे. मुंबई इंडियन्सने कोलकात्याचा 22 वेळा पराभव केला आहे, तर 6 वेळा कोलकात्याचा विजय झाला आहे.

Published by: Shreyas
First published: April 13, 2021, 7:06 PM IST

ताज्या बातम्या