• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : Mumbai Indians ची कामगिरी बघून रोहित नाही, तर विराटवरच डोक्याला हात लावायची वेळ, कारण...

IPL 2021 : Mumbai Indians ची कामगिरी बघून रोहित नाही, तर विराटवरच डोक्याला हात लावायची वेळ, कारण...

आयपीएल 2021 च्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians Batting) बॅटिंगचा संघर्ष सुरूच आहे. मुंबई इंडियन्सची ही बॅटिंग बघून रोहित शर्मापेक्षा (Rohit Sharma) जास्त टेन्शनमध्ये विराट कोहली (Virat Kohli) असेल.

 • Share this:
  अबु धाबी, 23 सप्टेंबर : आयपीएल 2021 च्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians Batting) बॅटिंगचा संघर्ष सुरूच आहे. 19 सप्टेंबरपासून आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडला युएईमध्ये सुरुवात झाली. आयपीएलचा पहिला राऊंड भारतामध्ये एप्रिल-मे महिन्यात झाला, पण कोरोनामुळे स्पर्धा स्थगित करावी लागली. मुंबईने या मोसमात आतापर्यंत 9 मॅच खेळल्या आहेत, पण यातल्या 7 मॅचमध्ये त्यांना एकदाही 160 रनचा टप्पा गाठता आला नाही. आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये चेन्नईविरुद्धच्या (MI vs CSK) सामन्यात मुंबईला 157 रनच्या आव्हानाचाही पाठलाग करता आला नाही. या सामन्यात मुंबईने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून फक्त 136 रन केले, तर कोलकात्याविरुद्धच्या (MI vs CSK) मॅचमध्ये मुंबईला 20 ओव्हरमध्ये फक्त 155 रन करता आल्या. विराट टेन्शनमध्ये मुंबई इंडियन्सची ही बॅटिंग बघून रोहित शर्मापेक्षा (Rohit Sharma) जास्त टेन्शनमध्ये विराट कोहली (Virat Kohli) असेल. कारण मुंबई इंडियन्सच्या तब्बल 6 खेळाडूंची टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T 20 World Cup) टीममध्ये निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत, पण त्यांचा फॉर्म बघता टी-20 वर्ल्ड कपमधली भारताची चिंता वाढू शकते. रोहितचा खराब शॉट कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्मा खराब शॉट खेळून आऊट झाला. गेल्या काही आयपीएलपासून रोहितला मोसमात मोठी खेळी करण्यातही अपयश आलं आहे. असं असलं तरी रोहित या मोसमातला मुंबईचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. 8 सामन्यांमध्ये 35 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राईक रेटने रोहितने 283 रन केले, यात एक अर्धशतक आहे. रोहितचा स्ट्राईक रेट मात्र चिंतेचा विषय आहे. सूर्या-इशानचा संघर्ष सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनाही या आयपीएलमध्ये संघर्ष करावा लागला आहे, तसंच या दोघांच्या शॉट सिलेक्शनवरही टीका होत आहे. सूर्याने या मोसमातल्या 9 सामन्यांमध्ये 20.11 च्या सरासरीने 181 रन केले ज्यात एक अर्धशतक आहे. तर इशान किशनने 7 सामन्यांमध्ये फक्त 14 च्या सरासरीने 98 रन केले. इशान किशनला या मोसमात एकही अर्धशतक करता आलेलं नाही. हार्दिकचा फिटनेस हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) फिटनेसही विराटसह टीम इंडियाची चिंता वाढवणारा आहे. आयपीएलच्या पहिल्या राऊंडमध्ये हार्दिकने फार बॉलिंग केली नाही, तर दुसऱ्या राऊंडच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये तो फिट नसल्यामुळे खेळू शकला नाही. आयपीएलच्या पहिल्या राऊंडमध्ये हार्दिक बॅटनेही संघर्ष करत होता. 7 सामन्यांमध्ये फक्त 8 च्या सरासरीने त्याने 52 रन केले.
  Published by:Shreyas
  First published: