IPL 2021 : 7 ओव्हर 39 रन आणि 5 विकेट, अशी गडगडली मुंबईची बॅटिंग

IPL 2021 : 7 ओव्हर 39 रन आणि 5 विकेट, अशी गडगडली मुंबईची बॅटिंग

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. बँगलोरविरुद्धच्या (RCB) सामन्यानंतर आता कोलकात्याविरुद्धही (KKR) मुंबईचे दिग्गज बॅट्समन सपशेल अपयशी ठरले आहेत.

  • Share this:

चेन्नई, 13 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. बँगलोरविरुद्धच्या (RCB) सामन्यानंतर आता कोलकात्याविरुद्धही (KKR) मुंबईचे दिग्गज बॅट्समन सपशेल अपयशी ठरले आहेत. मुंबई इंडियन्सला सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन बनवण्यामध्ये त्यांच्या मधल्या फळीतल्या आक्रमक बॅट्समननी मोलाची भूमिका बजावली होती, पण या मोसमाच्या पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबईचं हेच अस्त्र अपयशी ठरत आहे.

कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) ओपनिंगला आले, पण आपला पहिलाच सामना खेळणारा डिकॉक फक्त दोन रन करून माघारी परतला, यानंतर रोहित आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी कोलकात्याच्या बॉलिंगवर आक्रमण करायला सुरूवात केली. या दोघांमध्ये 76 रनची पार्टनरशीप झाली. पण सूर्यकुमार यादवची विकेट गेल्यानंतर मात्र मुंबईची बॅटिंग गडगडली. सूर्यकुमार यादवने 36 बॉलमध्ये 56 रन केले.

सूर्यकुमार यादव जेव्हा माघारी परतला तेव्हा मुंबईचा स्कोअर 10.3 ओव्हरमध्ये 86-2 असा होता, यानंतर इशान किशन 1 रनवर, रोहित शर्मा 43 रनवर, हार्दिक पांड्या 15 रनवर, पोलार्ड 5 रनवर, मार्को जेनसन शून्य रनवर आऊट झाले. मार्को जेनसनची विकेट गेली तेव्हा मुंबईचा स्कोअर 126-7 एवढा होता, तसंच 17.3 ओव्हर झाल्या होत्या, म्हणजेच मुंबईने फक्त 7 ओव्हरमध्येच त्यांचे 5 प्रमुख बॅट्समन गमावले.

कोलकात्याकडून आंद्रे रसेलने (Andre Russell) 2 ओव्हरमध्ये 15 रन देऊन 5 विकेट घेतल्या, तर पॅट कमिन्सला 2 विकेट मिळाल्या. वरुण चक्रवर्ती, शाकीब अल हसन आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

Published by: Shreyas
First published: April 13, 2021, 9:56 PM IST

ताज्या बातम्या