चेन्नई, 20 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला (IPL 2021) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅटिंगचा संघर्ष सुरुच आहे. दिल्लीविरुद्धच्या (Delhi Capitals) सामन्यात फक्त 5 ओव्हरमध्ये कागदावर मजबूत असलेली मुंबईची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे. अमित मिश्रा (Amit Mishra) याने मुंबईच्या बॅटिंगला खिंडार पाडलं. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) स्वस्तात परतला. मग रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यात 58 रनची पार्टनरशीप झाली, पण अमित मिश्राने रोहितला 40 रनवर आऊट केलं, तर सूर्यकुमारला आवेश खानने 24 रनवर माघारी पाठवलं.
अमित मिश्राने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) पहिल्याच बॉलला आऊट केलं, तर कायरन पोलार्डही (Kieron Pollard) 2 रनवर आऊट झाला. ललित यादवने कृणाल पांड्याला (Krunal Pandya) 1 रनवर बोल्ड केलं. या मोसमात मुंबईने तीन पैकी दोन सामने जिंकले असले तरी त्यांचे बॅट्समन अपयशी ठरले.
आयपीएलमध्ये यंदा मुंबईने सगळे सामने चेन्नईमध्ये खेळले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईच्या बॅट्समनना चमकदार कामगिरी करता आली नाही. मुंबईकडून तीन सामन्यांमध्ये फक्त सूर्यकुमार यादवलाच (Suryakumar Yadav) अर्धशतक करता आलं आहे. सूर्यकुमारने केकेआरविरुद्ध अर्धशतक केलं.
मुंबईचा दोन्ही सामन्यांमध्ये बुमराह, बोल्ट आणि राहुल चहर यांच्यामुळे विजय झाला आहे. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये टीमने 150 आणि 152 रनचं आव्हान यशस्वीरित्या वाचवलं. लेग स्पिनर राहुल चहरने मागच्या 2 सामन्यांमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. कोलकात्याविरुद्ध त्याला 4 विकेट घेण्यात यश आलं, यानंतर त्याने हैदराबादविरुद्धही 3 विकेट घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, IPL 2021, Mumbai Indians