Home /News /sport /

IPL 2021 : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या बायो-बबलमध्ये दाखल

IPL 2021 : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या बायो-बबलमध्ये दाखल

आयपीएल (IPL 2021) सुरू व्हायला आता 15 दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) खेळाडू बायो-बबलमध्ये यायला सुरूवात झाली आहे. इशान किशन, नॅथन कुल्टर नाईल, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) या खेळाडूंसह मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी बायो-बबलमध्ये प्रवेश केला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 मार्च : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यात चेन्नईमध्ये पहिला सामना रंगेल. कोरोना व्हायरसमुळे यावर्षी आयपीएल 6 शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. यात अहमदाबाद, बँगलोर, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांचा समावेश आहे. तसंच कोणत्याही टीमला त्यांच्या घरच्या मैदानात एकही सामना खेळता येणार नाही. आयपीएल सुरू व्हायला आता 15 दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्सचे खेळाडू बायो-बबलमध्ये यायला सुरूवात झाली आहे. इशान किशन, नॅथन कुल्टर नाईल, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) या खेळाडूंसह मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी बायो-बबलमध्ये प्रवेश केला आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं होतं. तर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या हे खेळाडू सध्या इंग्लंडविरुद्धची वनडे सीरिज खेळत आहेत. ही सीरिज संपल्यानंतर हे सगळे खेळाडू बायो-बबलमध्ये येतील. टीम इंडियाचे आणि इंग्लंडचे खेळाडू सध्या बायो-बबलमध्येच आहेत. बीसीसीआयच्या नियमांनुसार खेळाडू एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये जाऊ शकतात, यासाठी त्यांना क्वारंटाईन व्हायची गरज नाही. तर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली सीरिजही बायो-बबलमध्ये होणार आहे, त्यामुळे मुंबईचा महत्त्वाचा खेळाडू क्विंटन डिकॉकही थेट टीममध्ये सामील होऊ शकणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, IPL 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या