मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : आयपीएल सुरू व्हायच्या आधीच मुंबईला बसणार सगळ्यात मोठा धक्का!

IPL 2021 : आयपीएल सुरू व्हायच्या आधीच मुंबईला बसणार सगळ्यात मोठा धक्का!

आयपीएल 2021 (IPL 2021) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण यंदाची स्पर्धा सुरू होण्याआधीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण यंदाची स्पर्धा सुरू होण्याआधीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण यंदाची स्पर्धा सुरू होण्याआधीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मुंबई, 2 मार्च : आयपीएल 2021 (IPL 2021) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदाच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा अजून झाली नसली, तर एप्रिल महिन्यात स्पर्धेला सुरूवात होईल, असं सांगितलं जात आहे. पण यंदाची स्पर्धा सुरू होण्याआधीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातले कोरोनाचे (Maharashtra Corona) वाढते आकडे लक्षात घेता मुंबईत सामन्यांचं आयोजन होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

आयपीएलच्या नियमांनुसार यावर्षीचा ओपनिंग सामना आणि फायनल वानखेडे स्टेडियमवर खेळवणं अपेक्षित होतं. पण ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार बीसीसीआय (BCCI) महाराष्ट्राबाहेर स्पर्धेचं आयोजन करण्याचा विचार करत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. पण चेन्नई, बँगलोर, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्लीमध्य यावेळची स्पर्धा खेळली जाऊ शकते.

बीसीसीआयचे अधिकारी लवकरच आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलसोबत बैठक घेतील, त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

आयपीएलच्या तारखांची अजून घोषणा झालेली नसली, तरी 8 ते 12 एप्रिलदरम्यान स्पर्धेला सुरूवात होऊ शकते, असं बोललं जात आहे.

18 फेब्रुवारीला आयपीएलचा लिलाव झाला, त्यावेळी यंदाच्या वर्षी मॅच या मुंबई-पुण्यात, तसंच प्ले-ऑफचे सामने अहमदाबादमध्ये होतील, असं सांगण्यात येत होतं. पण इंग्लंड सीरिजच्या तिसऱ्या टेस्टवेळी अहमदाबादमध्ये मागच्या आठवड्यात एक बैठक झाली. या बैठकीला बोर्डाचे सचिव जय शाह, कोषाध्यक्ष अरुण धूमळ, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि अंतरिम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांच्यासह बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाच्या आकडेवारीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तसंच मुंबईत सामने खेळवावे का नाही, याबाबतही चर्चा झाली.

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर सोमवारी देण्यात आलेल्या आकड्यांनुसार महाराष्ट्रात भारतातले अर्धे कोरोना रुग्ण आहेत. भारतात सध्या कोरोनाचे 169,000 रुग्ण आहेत, यातले महाराष्ट्रात 78,212 रुग्ण आहेत. रविवारच्या तुलनेत महाराष्ट्रात सोमवारी 4,478 नवे रुग्ण आढळले, तर 62 मृत्यू झाले.

निवडणूक आयोगाने काही राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये 27 मार्च ते 29 एप्रिलदरम्यान 8 चरणांमध्ये निवडणुका होणार आहेत, तर 2-4 मेमध्ये मतमोजणी होणार आहे. तामीळनाडूमध्ये 6 एप्रिलला निवडणुका होतील आणि 5 मेरोजी निकाल जाहीर करण्यात येतील. या निवडणुका आयपीएल दरम्यानच होत असल्यामुळे वेळापत्रक बनवताना याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

मुंबईमध्ये आयपीएल खेळवण्याबाबत साशंकता असली, तरी मोहाली आणि जयपूर यांचाही आयोजनात विचार करण्यात आलेला नाही. या ठिकाणांचा समावेश का करण्यात आला नाही, याबाबत अजून कोणतंही कारण सांगण्यात आलेलं नाही. ठिकाणांबाबत आणि तारखांबाबत अजूनही संभ्रम कायम असल्यामुळे आयपीएल फ्रॅन्चायजीही असंतुष्ट आहेत. याबाबत आम्हाला अधिकृत अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असं आयपीएलच्या अनेक टीमकडून सांगण्यात आलं आहे.

पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) टीमनी याबाबत हेमांग अमीन यांच्याशी संपर्कही साधला. मोहाली आणि हैदराबादचा समावेश संभावित ठिकाणांमध्ये झाला नसल्याची माहिती आम्हाला मीडियाकडून मिळाली. हे खूपच हैराण करणारं आहे, असं या टीमनी अमीन यांना सांगितल्याचं वृत्त ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलं आहे. तसंच मोहालीला ठिकाणांच्या यादीतून बाहेर का ठेवण्यात आलं, याचं कारण आम्हाला कळलं पाहिजे, अशी भूमिका पंजाबच्या टीमचे सीईओ सतीश मेनन यांनी मांडली.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Mumbai Indians