मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : धोनीचा एक मेसेज आणि 10 महिन्यांमध्ये बदललं CSK चं नशीब!

IPL 2021 : धोनीचा एक मेसेज आणि 10 महिन्यांमध्ये बदललं CSK चं नशीब!

डॅड्स आर्मी, म्हाताऱ्यांची टीम असं म्हणून चेन्नई सुपर किंग्सला (CSK) आयपीएल 2020 च्या (IPL 2020) मोसमात हिणवलं गेलं होतं, पण 10 महिन्यांमध्येच चेन्नईचं नशीब बदललं आणि त्यांनी पुन्हा एकदा आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये (IPL Play off) धडक मारली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 ऑक्टोबर : डॅड्स आर्मी, म्हाताऱ्यांची टीम असं म्हणून चेन्नई सुपर किंग्सला (CSK) आयपीएल 2020 च्या (IPL 2020) मोसमात हिणवलं गेलं होतं, पण 10 महिन्यांमध्येच चेन्नईचं नशीब बदललं आणि त्यांनी पुन्हा एकदा आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये (IPL Play off) धडक मारली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्ले-ऑफ गाठणारी चेन्नई पहिली टीम ठरली आहे. रेकॉर्ड 11 व्यांदा चेन्नईने प्ले-ऑफमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात सातव्या क्रमांकावर राहिलेली चेन्नई या मोसमात प्ले-ऑफसाठी क्वालिफाय झाली. चेन्नईची कामगिरी सुधारण्याचं श्रेय टीमचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) दिलं आहे. धोनीने दिलेल्या एका मेसेजमुळे टीमची कामगिरी सुधारल्याचं विश्वनाथ म्हणाले.

मागच्या मोसमातल्या खराब कामगिरीनंतर धोनीने खेळाडूंना खास संदेश दिला होता, ज्यामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. याचा परिणाम आता तुम्हाला दिसत आहे. काशी विश्वनाथन यांनी इनसाईड स्पोर्ट्सशी बोलताना धोनीच्या या खास मेसेजची कहाणी सांगितली.

'धोनीचा संदेश स्पष्ट होता. काळजी करण्याचं काहीही कारण नाही. आपला फक्त एकच मोसम खराब गेला, खेळामध्ये असं होतंच असतं. धोनीच्या या शब्दांमुळे खेळाडूंना पुन्हा विश्वास मिळाला. आपण सगळं काही गमावलं नाही, पुढच्या मोसमात जोरदार पुनरागमन करू शकतो, असं खेळाडूंना वाटलं. मागच्या मोसमानंतर आम्ही फार चिंतेत नव्हतो. आम्हाला कर्णधारावर पूर्ण विश्वास होता,' अशी प्रतिक्रिया विश्वनाथन यांनी दिली.

आयपीएल 2020 मध्ये काय चुकलं?

आयपीएल 2020 मध्ये प्ले-ऑफला न पोहोचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सबाबत मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण करण्यात आले. टीममधल्या खेळाडूंचं सरासरी वय 33 पेक्षा जास्त होतं. एमएस धोनी आणि अंबाती रायुडू चांगल्या फॉर्ममध्ये नव्हते. सुरेश रैनाही अचानक स्पर्धा सोडून भारतात परतला, ज्यामुळे टीमची मधली फळी कमजोर झाली. ड्वॅन ब्राव्होसारखा विश्वासार्ह ऑलराऊंडर दुखापतीमुळे बऱ्याच मॅच खेळू शकला नाही. त्यामुळे सॅम करन आणि लुंगी एनगिडीवर जास्त दबाव आला.

एवढच नाही तर आयपीएल 2021 साठीच्या लिलावाआधी चेन्नईने ब्राव्हो, रैना, डुप्लेसिस, इम्रान ताहिर आणि अंबाती रायुडू यांना रिटेन करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या सगळ्या खेळाडूंचं वय 35 पेक्षा जास्त आहे. हे सगळे खेळाडू कॅप्टन एमएस धोनीच्या विश्वासास पात्र ठरले. तसंच ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रविंद्र जडेजा आणि दीपक चहर यांनीही विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली.

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni