Home /News /sport /

IPL 2021 : धोनी मारतोय 100 मीटरपेक्षा लांब सिक्स, CSK ने शेयर केला VIDEO

IPL 2021 : धोनी मारतोय 100 मीटरपेक्षा लांब सिक्स, CSK ने शेयर केला VIDEO

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाची जोरदार तयारी करत आहे. मागच्या मोसमात चेन्नईची (CSK) कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली.

    चेन्नई, 21 मार्च : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाची जोरदार तयारी करत आहे. मागच्या मोसमात चेन्नईची (CSK) कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नाही. पॉईंट्स टेबलमध्येही चेन्नईची टीम सातव्या क्रमांकावर राहिली. यंदाच्या वर्षी हे अपयश धुवून काढण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. यावेळी धोनीच्या टीमचा पहिला सामना 10 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. यावेळची आयपीएल 9 एप्रिलपासून सुरू होणार असून 30 मे रोजी फायनल खेळवली जाणार आहे. आयपीएलच्या तयारीसाठी चेन्नई सुपरकिंग्जचा ट्रेनिंग कॅम्प चेन्नईमध्ये सुरू आहे. या कॅम्पमध्ये एमएस धोनी, अंबाती रायुडू, ड्वॅन ब्राव्हो, ऋतुराज गायकवाड यांच्यासह अनेक खेळाडू आहेत. चेन्नई सुपरकिंग्जने धोनीच्या सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी लांब सिक्स मारत आहे. धोनी 109 आणि 114 मीटरचे सिक्स मारत असल्याचं सीएसकेने ट्वीटमध्ये सांगितलं आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कोणत्याही टीमला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. कोरोनामुळे यावर्षी 6 ठिकाणी मॅचचं आयोजन करण्यात येणार आहे. आयपीएल इतिहासात चेन्नईने तीन वेळा तर मुंबईने सर्वाधिक पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, Csk, IPL 2021, MS Dhoni

    पुढील बातम्या