IPL 2021 : धोनीने दिलेला शब्द पाळला, शेवटपर्यंत मैदानात राहिला, कॅप्टन कूलने CSK चं मन जिंकलं!

IPL 2021 : धोनीने दिलेला शब्द पाळला, शेवटपर्यंत मैदानात राहिला, कॅप्टन कूलने CSK चं मन जिंकलं!

खेळाडू आणि टीम मॅनजमेंटमधल्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. यानंतर सगळे क्रिकेटपटू त्यांच्या घरी परतू लागले. चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनीही (MS Dhoni) त्याच्या रांचीच्या घरी परतला आहे.

  • Share this:

रांची, 7 मे : खेळाडू आणि टीम मॅनजमेंटमधल्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. यानंतर सगळे क्रिकेटपटू त्यांच्या घरी परतू लागले. चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनीही (MS Dhoni) त्याच्या रांचीच्या घरी परतला आहे. चेन्नईचे खेळाडू जोपर्यंत त्यांच्या घरी सुखरूप परतत नाहीत, तोपर्यंत आपण घरी जाणार नाही, असं धोनीने सांगितलं होतं, त्यानंतर चेन्नईचे सगळे खेळाडू घरी परतल्यानंतर धोनीने टीमचं हॉटेल सोडलं. एमएस धोनी घरी परतणारा चेन्नईचा शेवटचा खेळाडू ठरला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नईची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये होती. 7 पैकी 5 सामने जिंकत चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती.

39 वर्षांचा एमएस धोनी सध्या रांचीच्या त्याच्या घरी कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. आयपीएल सुरू असतानाच धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली.

जवळपास अर्धी आयपीएल झाल्यानंतर बायो-बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केला. केकेआरचे खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrier) यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. यानंतर चेन्नई सुपरकिंग्समध्ये बॉलिंग प्रशिक्षक एल बालाजी (L Balaji) आणि माईक हसी (Mike Hussey) तसंच आणखी दोघांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. दिल्लीचा अमित मिश्रा (Amit Mishra) आणि हैदराबादचा ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांनाही कोरोनाची लागण झाली, त्यामुळे बीसीसीआयला अखेर आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

आता उरलेले सामने कुठे होणार याबाबत अजून बीसीसीआयने (BCCI) काहीही स्पष्ट सांगितलं नाही, पण युएई (UAE) आणि इंग्लंड (England) हे दोन पर्याय असल्याचं समोर येत आहे. इंग्लंडमधल्या चार काऊंटी क्लबनी तिकडे आयपीएलचे उरलेले सामने खेळवण्याची ऑफर बीसीसीआयला दिली आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर आणि टी-20 वर्ल्ड कपच्या आधी युएई किंवा इंग्लंडमध्ये आयपीएलचे उरलेले सामने होऊ शकतात. असं असतानाच आता श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही (Sri Lanka Cricket) बीसीसीआयला आमच्याकडे आयपीएल खेळवण्याची ऑफर दिली आहे.

Published by: Shreyas
First published: May 7, 2021, 7:05 PM IST

ताज्या बातम्या