IPL 2021 : '...तर माझ्यामुळेच हरेल CSK', धोनीने कबूल केली सगळ्यात मोठी चूक

IPL 2021 : '...तर माझ्यामुळेच हरेल CSK', धोनीने कबूल केली सगळ्यात मोठी चूक

क्रिकेट रसिकांची लाडकी आयपीएल (IPL) ही टी-20क्रिकेट स्पर्धा सध्या सुरू आहे. सोमवारी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या टीमचा सामना अनुभवी अशा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध झाला. या सामन्यानंतर एमएस धोनीने (MS Dhoni) स्वत:ची मोठी चूक कबूल केली.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल : क्रिकेट रसिकांची लाडकी आयपीएल (IPL) ही टी-20क्रिकेट स्पर्धा सध्या सुरू आहे. सोमवारी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या टीमचा सामना अनुभवी अशा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध झाला. भारतीय क्रिकेट टीमचं उत्तमरीत्या नेतृत्व केल्यामुळे'कॅप्टन कूल'अशी उपाधी मिळालेला महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन असल्यामुळे त्याच्या आणि त्याच्या टीमच्या खेळाकडे सगळ्यांचं खूप लक्ष असतं. या सामन्यात धोनीने आपली एक चूक कदाचित टीमला महाग पडू शकली असती,असं मॅचनंतर म्हटलं आहे.

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पहिल्यांदा बॅटिंग करताना 188रन्स केले. त्यामुळे राजस्थानला जिंकण्यासाठी 189 रन्स करणं आवश्यक होतं. मात्र निर्धारित 20 ओव्हर्समध्ये राजस्थान ही कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्यांचा 45 रन्सनी पराभव झाला.

आयपीएलही स्पर्धा फटकेबाजीसाठीच प्रसिद्ध आहे. या मॅचमध्ये जेव्हा धोनी बॅटिंगसाठी मैदानात उतरलातेव्हा सगळे दर्शक त्याची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सुक होते. एकामागून एक फोरसिक्सची खैरात पाहायला मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या रसिकांची या मॅचमध्ये फारच निराशा झाली. कारण धोनी खूपच संथ गतीने खेळला. 17 बॉलमध्ये फक्त 18 रन्स करून धोनी आउट झाला. चेतन सकारियाच्या बॉलिंगवर जॉस बटलरने धोनीचा कॅच पकडला. माझा असा संथ खेळ टीमला भारी पडू शकतोअसं धोनीने मॅचनंतर म्हटलं.

पहिल्या सहा बॉलमध्ये तर धोनीने एकही रन काढली नाही. त्याबद्दल तो म्हणाला, 'मी पहिले सहा बॉल ज्याप्रकारे खेळलोते आमच्या टीमसाठी महागात पडू शकलं असतं. या सीझनमध्ये बरंच काही बदललं आहे. आम्ही अशा प्रकारे तयारी केली आहेकी जणू काही आम्ही एकाच टीममधून आलो आहोत. मागच्या हंगामातही बॉलर्सवर खूप दबाव होता.'

'वय वाढणं आणि तंदुरुस्त राहणंया दोन खूपच कठीण गोष्टी आहेत. तुम्ही खेळत असालतर तुम्हाला कोणी अनफिट म्हणावं हे तुम्हाला पटणार नाहीआवडणार नाही. मला टीममधल्या तरुण खेळाडूंसोबत मिळून चालायचं आहे. ते खूप जास्त धावतातत्यांच्यासोबत खेळणं आव्हानात्मक असतं,' असंही धोनीने सांगितलं.

First published: April 20, 2021, 10:53 PM IST

ताज्या बातम्या