मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : धोनीचा नवा लूक बघून बसेल धक्का, चाहते म्हणाले रणवीरपासून लांब राहा!

IPL 2021 : धोनीचा नवा लूक बघून बसेल धक्का, चाहते म्हणाले रणवीरपासून लांब राहा!

धोनीचा नवा लूक पाहून चाहते संतापले

धोनीचा नवा लूक पाहून चाहते संतापले

एमएस धोनी (MS Dhoni) लवकरच क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा दिसणार आहे. युएईमध्ये आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे. याआधी धोनी त्याच्या नव्या हेयरस्टाईलमुळे चर्चेत आला आहे.

मुंबई, 19 ऑगस्ट : एमएस धोनी (MS Dhoni) लवकरच क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा दिसणार आहे. युएईमध्ये आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे. याआधी धोनी त्याच्या नव्या हेयरस्टाईलमुळे चर्चेत आला आहे. एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी धोनीने आपली हेयरस्टाईल बदलली. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, पण धोनीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीला उतरला नाही.

एमएस धोनीचा एक फोटो आयपीएलचं प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने शेयर केला. या फोटोमध्ये धोनीचे केस रंगी-बेरंगी दिसत आहेत, तसंच त्याने झगमगणारं जॅकेटही घातलं आहे. या लूकमध्ये धोनी रॉकस्टार दिसत आहे. हा फोटो एका जाहिरातीसाठीचा आहे. असली पिक्चर अभी बाकी है, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. धोनीच्या या फोटोवर त्याचे चाहते नाराज झाले आहेत, तशा कमेंट त्यांनी या फोटोवर केल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याच्यापासून लांब राहण्याचा सल्ला रणवीर सिंगला चाहत्यांनी दिला. मुंबईत एका फूटबॉल मॅचदरम्यान धोनी आणि रणवीर एकत्र आले होते. धोनीने मुंबईत एका जाहिरातीचं शूटिंग केलं होतं, त्यावेळी त्याने टीम इंडियाची रेट्रो जर्सी घातली होती. धोनीने रंगी-बेरंगी हेयरस्टाईल आयपीएलच्या नव्या जाहिरातीसाठी केली आहे.

चेन्नई सुपरकिंग्सने दुबईमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. युएईमध्ये पोहोचणारी चेन्नई पहिलीच टीम होती, त्यामुळे खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधीही संपला आहे. चेन्नईनंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) शुक्रवारपासून सरावाला सुरुवात करतील. आयपीएल 2021 चा 30 वा सामना 19 सप्टेंबरला मुंबई आणि चेन्नई यांच्यात होणार आहे.

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni