मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : एमएस धोनीने इतिहास घडवला, हा विक्रम करणारा जगातला पहिलाच

IPL 2021 : एमएस धोनीने इतिहास घडवला, हा विक्रम करणारा जगातला पहिलाच

एमएस धोनीने (MS Dhoni) आणखी एक विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (CSK vs Rajasthan Royals) सामन्यात धोनी मैदानात टॉससाठी उतरला तेव्हा त्याचा हा चेन्नईसाठी कर्णधार म्हणून 200 वा सामना होता.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 19 एप्रिल : एमएस धोनीने (MS Dhoni) आणखी एक विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (CSK vs Rajasthan Royals) सामन्यात धोनी मैदानात टॉससाठी उतरला तेव्हा त्याचा हा चेन्नईसाठी कर्णधार म्हणून 200 वा सामना होता. आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये कोणालाही हा रेकॉर्ड करता आला नाही. धोनीने 19 एप्रिल 2008 साली पहिल्यांदा आयपीएलमध्ये (IPL) चेन्नईचं नेतृत्व केलं होतं, त्यानंतर बरोबर 13 वर्षांनी म्हणजे पुन्हा 19 एप्रिललाच धोनी चेन्नईचं नेतृत्व करत आहे.

एमएस धोनचं आयपीएलमध्ये चेन्नईसाठी कर्णधार म्हणून ही 177वी मॅच आहे, यापैकी 106 सामन्यामध्ये त्याने टीमला विजय मिळवून दिला आहे, तर 69 सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. एका सामन्याचा निकालच लागला नाही. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली, पण मागच्या मोसमात त्यांची कामगिरी निराशाजनक जाली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफ गाठता आली नाही.

एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने दोनदा चॅम्पियन्स लीग ही स्पर्धाही जिंकली. 2010 आणि 2014 साली चेन्नईला ही स्पर्धा जिंकता आली, पण 2014 नंतर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नाही. चॅम्पियन्स लीगमध्ये धोनीने 23 सामन्यांमध्ये चेन्नईचं नेतृत्व केलं, यातल्या 14 सामन्यांत त्यांचा विजय झाला, तर 8 सामने गमवावे लागले आणि एक मॅच टाय झाली. आयपीएलमध्ये धोनीने 4,632 रन केले आहेत आणि 23 अर्धशतकं केली आहेत.

एमएस धोनीची चेन्नईसाठीची ही 201 वी मॅच आहे. आयपीएलमध्ये तो 177 तर चॅम्पियन्स लीगमध्ये 24 सामने खेळला आहे. तर एकूण आयपीएलमधली धोनीची ही 207वी मॅच आहे. चेन्नईवर दोन वर्षांची बंदी घातल्यानंतर धोनीने पुण्याकडून 30 सामने खेळले.

एमएस धोनीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही कर्णधार म्हणून टी-20 रेकॉर्ड चांगलं आहे. 2007 साली त्याच्याच नेतृत्वात भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, पुढे 2011 च्या 50 ओव्हर वर्ल्ड कपमध्ये आणि 2013 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा धोनीच्याच नेतृत्वात विजय झाला. धोनीनंतर कोहलीकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं, पण भारताला अजूनपर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, तेव्हा विराटकडे ही संधी आहे.

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni