Home /News /sport /

IPL 2021 : ...म्हणून धोनी ग्रेट आहे, एका सल्ल्याने पलटली मॅच

IPL 2021 : ...म्हणून धोनी ग्रेट आहे, एका सल्ल्याने पलटली मॅच

एमएस धोनीचं (MS Dhoni) नेतृत्व आणि त्याची क्रिकेटबद्दलची समज अफाट आहे, याबाबत कोणालाही शंका नाही. धोनीने सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (CSK vs Rajasthan Royals) सामन्यात पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे.

    मुंबई, 20 एप्रिल : एमएस धोनीचं (MS Dhoni) नेतृत्व आणि त्याची क्रिकेटबद्दलची समज अफाट आहे, याबाबत कोणालाही शंका नाही. धोनीने सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (CSK vs Rajasthan Royals) सामन्यात पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे. मॅचदरम्यान धोनीची भविष्यवाणी एवढी अचूक ठरली की राजस्थानचा बॅट्समन जॉस बटलर क्लीन बोल्ड झाला. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) आणि प्रग्यान ओझा (Pragyan Ojha) यांनीही धोनीच्या खेळाबाबतच्या या समजाचं कौतुक केलं. चेन्नईने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 189 रनचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना जॉस बटरल (49) आणि शिवम दुबे (17) यांच्यात 45 रनच्या पार्टनरशीपमुळे चेन्नईसमोरच्या अडचणी वाढत होत्या, पण यानंतर मॅच पलटली. रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) टाकलेल्या 10 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला बटलरने (Jos Buttler) सिक्स मारली. बॉल स्टेडियमच्या स्टॅण्डमध्ये गेल्यामुळे बदलण्यात आला, त्यामुळे चेन्नईला दवामुळे ओल्या झालेल्या बॉलऐवजी सुका बॉल मिळाला. चेन्नईला नवीन बॉल मिळाल्यानंतर खेळपट्टीमागे उभा असलेला धोनने जडेजाला बॉल सुका आहे, त्यामुळे स्पिन होईल, असं सांगितलं. जडेजाने 12 व्या ओव्हरचा पहिला बॉल टाकला तेव्हा कॉमेंटेटरच्याही धोनी असं का म्हणाला ते लक्षात आलं. जडेजाने टाकलेला हा बॉल लेग स्टम्पवर पडला आणि स्पिन होऊन बटलरचा ऑफ स्टम्प उडाला. याच ओव्हरमध्ये जडेजाने शिवम दुबेलाही (Shivam Dubey) एलबीडब्ल्यू केलं. बॉल वळत असल्याचं लक्षात आल्यानंतर धोनीने मोईन अलीला (Moeen Ali) बॉलिंग दिली. मोईन अलीनेही धोनीवरचा विश्वास सार्थ ठरवला आणि दोन विकेट घेतल्या. या सामन्यात जडेजाने चार कॅच पकडले, यावरून धोनीने फिल्डरही योग्य ठिकाणी ठेवले होते, हे लक्षात येतं, असं गावसकर म्हणाले. दुसरीकडे प्रग्यान ओझानेही धोनीच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. धोनीच्या एका सल्ल्यानंतर जडेजाला बटलरची विकेट मिळाली आणि मॅचचं चित्र पालटलं. यानंतर मोईन अलीनेही सुक्या बॉलचा फायदा घेत राजस्थानच्या डेव्हिड मिलर आणि रियान परागला आऊट केलं आणि चेन्नईचा विजय निश्चित केला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Csk, IPL 2021, MS Dhoni, Ravindra jadeja

    पुढील बातम्या