IPL 2021 : वानखेडे स्टेडियमवर धोनीने पुन्हा घडवला इतिहास, हा विक्रम करणारा पहिलाच

IPL 2021 : वानखेडे स्टेडियमवर धोनीने पुन्हा घडवला इतिहास, हा विक्रम करणारा पहिलाच

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या एमएस धोनीने (MS Dhoni) 10 वर्षानंतर याच मैदानात आणखी एक विक्रम केला आहे. आयपीएल (IPL) इतिहासात एका टीमकडून (CSK) 200 मॅच खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या एमएस धोनीने (MS Dhoni) 10 वर्षानंतर याच मैदानात आणखी एक विक्रम केला आहे. आयपीएल (IPL) इतिहासात एका टीमकडून 200 मॅच खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर झाला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या (Punjab Kings) सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) कर्णधार असलेला धोनी जेव्हा टॉससाठी मैदानात उतरला तेव्हा धोनीने हा रेकॉर्ड केला. धोनीचा चेन्नई सुपरकिंग्सकडून हा 200 वा सामना होता. महत्त्वाचं म्हणजे यातला फक्त एका सामन्यात धोनीने चेन्नईचं नेतृत्व केलं नाही. 2012 सालच्या चॅम्पियन्स लीगमध्ये धोनी चेन्नईच्या अंतिम-11 खेळाडूंमध्ये होता, पण तो कर्णधार नव्हता.

धोनीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून 176 सामने खेळले, तर चॅम्पियन्स लीगमध्ये त्याने 24 सामन्यांमध्ये चेन्नईचं प्रतिनिधीत्व केलं. धोनी 2016-17 साली रायजिंग पुणे सुपरजायंट्सच्या टीममध्ये होता, तेव्हा त्याने 30 मॅच खेळल्या.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीनवेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आतापर्यंत त्याने चेन्नईकडून 199 सामन्यांमध्ये 40.63 च्या सरासरीने 4,632 रन केले, यात 23 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमधला धोनीचा स्ट्राईक रेट 136 आहे.

39 वर्षांच्या धोनीने 24 चॅम्पियन्स लीगच्या मॅचही खेळल्या, यात त्याने 449 रन केले. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 2010 आणि 2014 सालची चॅम्पियन्स लीग जिंकली. आयपीएल इतिहासात धोनीने 216 सिक्स मारले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही धोनीच्याच नावावर आहे. त्याने आतापर्यंत 206 आयपीएल मॅच खेळल्या आहेत. त्या खालोखाल रोहित शर्माने 202, दिनेश कार्तिकने 198, सुरेश रैनाने 195 आणि विराट कोहलीने 194 आयपीएल मॅचमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे.

Published by: Shreyas
First published: April 16, 2021, 10:06 PM IST

ताज्या बातम्या