IPL 2021 : ...म्हणून मुंबई इंडियन्सने मला रिलीज केलं, मॅकलेनघनने सांगितलं कारण

IPL 2021 : ...म्हणून मुंबई इंडियन्सने मला रिलीज केलं, मॅकलेनघनने सांगितलं कारण

न्यूझीलंडचा फास्ट बॉलर मिचेल मॅकलेनघन (Mitchell Mcclenaghan) सोशल मीडियावर बराच सक्रीय असतो. गुरूवारी मॅकलेनघनने त्याच्या चाहत्यांना ट्विटरवरून प्रश्नांची उत्तरं दिली. यातल्या बहुतेक चाहत्यांनी मॅकलेनघनला सध्या सुरू असलेल्या आयपीएलबाबत (IPL 2021) प्रश्न विचारले.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : न्यूझीलंडचा फास्ट बॉलर मिचेल मॅकलेनघन (Mitchell Mcclenaghan) सोशल मीडियावर बराच सक्रीय असतो. गुरूवारी मॅकलेनघनने त्याच्या चाहत्यांना ट्विटरवरून प्रश्नांची उत्तरं दिली. यातल्या बहुतेक चाहत्यांनी मॅकलेनघनला सध्या सुरू असलेल्या आयपीएलबाबत (IPL 2021) प्रश्न विचारले. मिचेल मॅकलेनघनला आयपीएलच्या यंदाच्या मोसमाआधी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रिलीज केलं, तसंच त्याला लिलावातही विकत घेतलं नाही. आयपीएलच्या 2020 सालच्या मोसमातही त्याला एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. एका चाहत्याने मॅकलेनघनला मुंबई इंडियन्सने का रिलीज केलं, असा प्रश्न विचारला. मॅकलेनघननेही या प्रश्नाला सरळ आणि स्पष्ट उत्तर दिलं.

मी खूप जाड झालो आणि शारिरिकदृष्ट्या फिट नसल्यामुळे मुंबई इंडियन्सने मला रिलीज केलं आणि लिलावात विकत घेतलं नाही, असं मॅकलेनघन म्हणाला.

2015 पासून मिचेलने आयपीएलमध्ये करियर सुरू केलं, पहिल्यापासून तो मुंबईच्याच टीममध्ये होता. या 6 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्याने 56 सामन्यांमध्ये 8.49 च्या सरासरीने 71 विकेट घेतल्या. मॅकलेनघन टीममध्ये असताना मुंबईने 2015, 2017, 2019 आणि 2020 साली आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी ठिकठाक झाली आहे. आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबईने कोलकाता आणि हैदराबादवर विजय मिळवला, पण दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या पदरी निराशा आली.

Published by: Shreyas
First published: April 23, 2021, 5:29 PM IST

ताज्या बातम्या