मुंबई, 8 एप्रिल : आयपीएलच्या 14 व्या मोसमाला (IPL 2021) शुक्रवार 9 एप्रिलपासून सुरूवात होत आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यामध्ये पहिला सामना रंगेल. लागोपाठ तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी रोहित शर्माची मुंबई इंडियन्स मैदानात उतरेल, तर दुसरीकडे विराटच्या आरसीबीला अजून एकदाही आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलेलं नाही, त्यामुळे आरसीबीही पहिल्यांदाच आयपीएल जिंकण्याचं स्वप्न बघत आहे. मागच्या मोसमात इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपरकिंग्सला (CSK) प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नव्हता, त्यामुळे धोनीची टीमही यावर्षी कामगिरी सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल.
कोरोना व्हायरसमुळे यावेळच्या आयपीएलचं आयोजन बायो-बबलमध्ये होणार आहे. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामने पाहण्याची परवानगीही देण्यात आलेली नाही. आयपीएलच्या सुरूवातीपासूनच अनेक माजी क्रिकेटपटूंनी वेगवेगळी भविष्यवाणी केली आहे. क्रिकेटचे तज्ज्ञ प्रत्येक टीमची ताकत आणि कमजोरीही सांगत आहेत.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन(Michael Vaughan) याने यावर्षीही मुंबई इंडियन्सच ट्रॉफी जिंकेल अशी भविष्यवाणी केली आहे. याआधीही मायकल वॉनने अनेकवेळा मुंबई इंडियन्सचं कौतुक केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजवेळीही टीम इंडियापेक्षा मुंबई इंडियन्सची टीम जास्त मजबूत असल्याचं वक्तव्य मायकल वॉनने केलं होतं.
आयपीएलच्या मागच्या मोसमात मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता आणि पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. आता सहाव्यांदाही मुंबईला आयपीएल जिंकण्याची संधी असल्याचं मत मायकल वॉनने व्यक्त केलं आहे. मुंबईनंतर मायकल वॉनची आवडती टीम सनरायजर्स हैदराबाद आहे.
मुंबई आयपीएल विजयाची हॅट्रिक करणारी पहिली टीम बनू शकते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसह मुंबईकडे रोहित शर्माच्या रुपात यशस्वी कर्णधारही आहे.
मुंबईची टीम
रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ट्रेन्ट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, एडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, पियुष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंग, जेम्स नीशम, अर्जुन तेंडुलकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Mumbai Indians