IPL 2021 : भारतातच अडकला हसी, ना ऑस्ट्रेलियाला जाऊ शकत, ना मालदीवला, पाहा कारण

IPL 2021 : भारतातच अडकला हसी, ना ऑस्ट्रेलियाला जाऊ शकत, ना मालदीवला, पाहा कारण

आयपीएल 2021 (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू (Australian Players in Maldives) मालदीवला गेले. पण मायकल हसीसमोर (Michael Hussey) मात्र नवी अडचण निर्माण झाली आहे. मायकल हसी हा सध्या भारतात आहे, पण त्याला मालदीवलाही जाता येत नाही.

  • Share this:

मुंबई, 13 मे : आयपीएल 2021 (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू (Australian Players in Maldives) मालदीवला गेले, कारण ऑस्ट्रेलियाने भारतातून येणारी विमानसेवा बंद केली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने जर ही बंदी वाढवली नाही, तर रविवारी हे सगळे खेळाडू ऑस्ट्रेलियाला परततील, पण मायकल हसीसमोर (Michael Hussey) मात्र नवी अडचण निर्माण झाली आहे. मायकल हसी हा सध्या भारतात आहे, पण त्याला मालदीवलाही जाता येत नाही.

मालदीवने दक्षिण आशियातून येणाऱ्या लोकांचा व्हिजा निलंबित केला आहे, यामध्ये भारताचाही समावेश आहे, त्यामुळे हसीला मालदीवला जाता येणार नाही. मायकल हसीला रविवारच्या आधी मालदीवला पोहोचायचं होतं, पण व्हिजा निलंबित केल्यामुळे तो मालदीवला जाऊ शकणार नाही.

मायकल हसी आयपीएल 2021 दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता, त्यानंतर त्याला दिल्लीवरून चेन्नईला विमानाने हलवण्यात आलं. भारतातून मालदीवला जाण्याआधी हसीच्या तीन कोरोना टेस्ट होणार होत्या. पहिल्या टेस्टमध्ये तो निगेटिव्ह आला होता, पण दुसऱ्या टेस्टमध्ये तो पुन्हा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे हसीला पुन्हा एकदा क्वारंटाईन व्हावं लागलं. आता भारतातून मालदीवला जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे हसीला काही दिवस भारतातच थांबावं लागेल. हसीची आणखी एक कोविड टेस्ट होईल, यानंतर त्याच्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ काशी विश्वनाथ म्हणाले.

38 ऑस्ट्रेलियन मालदीवमध्ये

आयपीएल स्थगित झाल्यानंतर मालदीवमध्ये अडकलेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि कॉमेंटेटर असे एकूण 38 जणं रविवारी ऑस्ट्रेलियात परतू शकतात, पण ऑस्ट्रेलियन सरकारने याबाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही. 6 मे रोजी ऑस्ट्रेलियाच्या 14 खेळाडूंसह एकूण 38 जण ऑस्ट्रेलियाला पोहोचले होते. भारतातल्या वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे ऑस्ट्रेलियाने 15 मेपर्यंत भारतातून येणाऱ्या नागरिकांवर बंदी घातली आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार सध्या जे ऑस्ट्रेलियन 38 जण मालदीवमध्ये त्यांना विशेष विमानाने मालदीव-मलेशिया वरून सिडनीमध्ये पोहोचवलं जाऊ शकतं, यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल. ऑस्ट्रेलियन सरकारने मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.

Published by: Shreyas
First published: May 13, 2021, 7:07 PM IST

ताज्या बातम्या