मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: डिविलियर्सनं केली विराटची नक्कल, मुंबईला हरवल्यानंतर RCB चं सेलिब्रेशन VIDEO

IPL 2021: डिविलियर्सनं केली विराटची नक्कल, मुंबईला हरवल्यानंतर RCB चं सेलिब्रेशन VIDEO

या व्हिडीओमध्ये एबी डिविलियर्स (AB de Villiers) त्याचा जीवलग मित्र आणि आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीची (Virat Kohli) नक्कल करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये एबी डिविलियर्स (AB de Villiers) त्याचा जीवलग मित्र आणि आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीची (Virat Kohli) नक्कल करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये एबी डिविलियर्स (AB de Villiers) त्याचा जीवलग मित्र आणि आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीची (Virat Kohli) नक्कल करताना दिसत आहे.

दुबई, 27 सप्टेंबर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) यूएईमधील पराभवाची मालिका खंडित केली आहे. रविवारी रात्री झालेल्या मॅचमध्ये आरसीबीनं मुंबई इंडियन्सचा (MI vs RCB) 54 रननं पराभव केला. कॅप्टन विराट कोहलीचं (Virat Kohli) अर्धशतक, ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell) ऑल राऊंड कामगिरी आणि हर्षल पटेलच्या (Harshal Patel) 4 विकेट्स हे या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं.

आरसीबीचा या आयपीएल सिझनमधील हा सहावा विजय आहे. या विजयानंतर त्यांचे 12 पॉईंट्स झाले असून 'प्ले ऑफ'ची दावेदारी भक्कम झाली आहे. मुंबई इंडियन्सवरील विजयानंतर आरसीबीच्या टीममध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये या विजयानंतर जल्लोष करण्यात आला. या जल्लोषामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये एबी डिविलियर्स (AB de Villiers) त्याचा जीवलग मित्र आणि आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीची नक्कल करताना दिसत आहे. एखादी विकेट पडल्यानंतर विराट कशा पद्धतीनं सेलिब्रेशन करतो याची नक्कल डिविलियर्स करत आहे. त्यानं केलेली ही नक्कल पाहण्यासाठी विराट तिथं उपस्थित होता की नाही? हे या व्हिडीओमध्ये दिसत नाही. पण, टीममधील अन्य सहकारी याचा पूर्ण आनंद घेत आहे. डिविलियर्स हा फक्त चांगला बॅट्समन नाही तर कलाकार देखील आहे, हे या व्हिडीओमधून स्पष्ट होते.

रविवारी झालेल्या मॅचमध्ये बंगळुरुनं पहिल्यांदा बॅटींग करत मुंबईसमोर 166 रनचं आव्हान ठेवलं होतं. पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईला हे आव्हान पेलवलं नाही. मुंबईची टीम 111 रनवर ऑल आऊट झाली. मुंबईकडून  रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. रोहितने सर्वाधिक ४३ रन्स केले. तर क्विंटन डी कॉक 24 रन्स केले. या दोघांनी केलेल्या चांगल्या सुरुवातीचा मुंबईला फायदा उठवता आला नाही.

IPL 2021, MI vs RCB: बाबा आऊट होताच रागावला डिविलियर्सचा मुलगा, ज्युनिअर ABD चा Video Viral

आरसीबीकडून हर्षल पटेल (Harshal Patel) सर्वाधिक यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 4 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड आणि राहुल चहर यांना सलग तीन बॉलवर आऊट करत हर्षलनं हॅट्ट्रिक घेतली. या विजयानंतर आरसीबीचे 12 पॉईंट्स झाले असून 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याच्या त्यांच्या आशा वाढल्या आहेत. तर मुंबई इंडियन्सची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

First published:

Tags: IPL 2021, RCB, Virat kohli