मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021, MI vs PBKS: 5 वेळा चँपियन ठरलेल्या Mumbai Indiansची अवस्था बिकट, आज 'करो या मरो'ची स्थिती

IPL 2021, MI vs PBKS: 5 वेळा चँपियन ठरलेल्या Mumbai Indiansची अवस्था बिकट, आज 'करो या मरो'ची स्थिती

आयपीएल (IPL 2021 latest Update) आता रंगात आली आहे. आज मंगळवारी दोन मॅचेस खेळल्या जाणार आहेत. दुसऱ्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Punjab Kings) सामना पंजाब किंग्जशी होणार आहे.

आयपीएल (IPL 2021 latest Update) आता रंगात आली आहे. आज मंगळवारी दोन मॅचेस खेळल्या जाणार आहेत. दुसऱ्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Punjab Kings) सामना पंजाब किंग्जशी होणार आहे.

आयपीएल (IPL 2021 latest Update) आता रंगात आली आहे. आज मंगळवारी दोन मॅचेस खेळल्या जाणार आहेत. दुसऱ्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Punjab Kings) सामना पंजाब किंग्जशी होणार आहे.

  मुंबई, 28 सप्टेंबर: आयपीएल (IPL 2021 latest Update) आता रंगात आली आहे. आज मंगळवारी दोन मॅचेस खेळल्या जाणार आहेत. दुसऱ्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Punjab Kings) सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. अबुधाबीच्या  शेख झायेद स्टेडियमवर (Sheikh Zayed Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता ही मॅच सुरू होईल. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही टीमना ही मॅच जिंकणं अनिवार्य आहे.

  पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सची स्थिती यंदा खूपच वाईट आहे. मुंबईने आतापर्यंत 10 पैकी फक्त चार मॅचेस जिंकल्या आहेत. यूएईमध्ये (UAE) आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही मॅचेसमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबईला उर्वरित चारही मॅचेस जिंकाव्या लागतील. दुसरीकडे पंजाब किंग्ज टीमची स्थितीही फारशी चांगली नाही; पण नेट रन रेटच्या आधारावर ते मुंबईच्या वरच्या स्थानावर आहेत. आतापर्यंत अपयशी ठरलेली मुंबईची मधली फळी चांगली कामगिरी करून पंजाबविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करील.

  पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत 25 मॅचेस खेळल्या गेल्या आहेत. यामध्ये मुंबईने 14 मॅचेसमध्ये पंजाबचा पराभव केला आहे. पंजाबने 11 मॅचेस जिंकल्या आहेत. आकडेवारीत मुंबईचा वरचष्मा असला तरी सध्याच्या परिस्थितीत रोहित शर्माचा संघ पंजाबपेक्षा दुबळा दिसत आहे.

  RCB कडून IPL मध्ये हॅट्रिक घेणारा हर्षल पटेल ठरला तिसरा गोलंदाज

  मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात 28 सप्टेंबरला होणारी आयपीएल 2021ची 42 वी मॅच स्टार इंडिया नेटवर्क चॅनेल्सवर आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट पाहता येईल. हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त सहा प्रादेशिक भाषांमध्येदेखील मॅच पाहता येईल. तसंच आयपीएल 2021च्या सर्व मॅचेसचं थेट प्रक्षेपण स्टारचा व्हिडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारवर दिसेल.

  सलग तीन मॅचेस गमावल्यानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या अव्वल फळीतल्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav not in form) आणि ईशान किशनसारखे (Ishan Kishan latest news) युवा फलंदाज, ज्यांनी गेल्या दोन आयपीएलमध्ये टीमच्या जेतेपदासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यांचा फॉर्म वाईट आहे. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) शेवटच्या दोन मॅचमध्ये 33 आणि 43 रन काढल्या; मात्र आपली ही खेळी तो मोठ्या डावात परिवर्तित करू शकला नाही.

  आयपीएल 2021 : रवींद्र जाडेजाच्या `या` कृतीमुळे फॅन्सनी केलं त्याचं कौतुक

  मागच्या मॅचमध्ये सूर्यकुमारच्या आधी ईशानला बॅटिंगची संधी देण्यात आली. त्यामुळे सूर्यकुमारला पुढच्या मॅचमध्ये टीममधून वगळलं जाऊ शकतं. दोन मॅचमध्ये संघाबाहेर असलेल्या हार्दिक पंड्याचं पुनरागमन झालं आहे; पण त्याला विशेष छाप पाडता आली नाही. मुंबईसाठी खेळणारे हे खेळाडू टीम इंडियाच्या टी-20 विश्वचषक टीमचा भाग आहेत. त्यांच्या खराब फॉर्मने चाहते चिंताग्रस्त आहेत.

  मुंबईसाठी गोलंदाजी करताना बुमराहने तीन मॅचमध्ये आठ विकेट्स घेतल्या आहेत; पण ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिलन यांना फक्त तीन विकेट्स मिळू शकल्या. दुसरीकडे, टी-20 विश्वचषक टीममध्ये निवड झालेल्या राहुल चाहरने निराशा केली आहे. कृणाल पंड्याचीही कामगिरी फारशी चांगली झालेली नाही.

  पंजाब टीममधले मोहम्मद शमी, अर्शदीप, ब्रार यांनी उत्कृष्ट बॉलिंग केली आहे. कॅप्टन केएल राहुल, मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, अॅडन मार्कराम आणि निकोलस पूरन यांच्यासह पंजाबची बँटिंग मुंबईपेक्षा मजबूत दिसते.

  कसा असणार मुंबई इंडियन्सचा संघ?

  रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, अनुकुल रॉय, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जेम्स नीशम, जयंत यादव, किरॉन पोलार्ड, मार्को जॅन्सेन, युधवीर सिंग, अॅडम मिल्ले, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मोहसिन खान, नॅथन कुल्टर-नाईल, पीयूष चावला, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट.

  कसा असणार पंजाब किंग्जचा संघ?

  केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, शाहरुख खान, मोहम्मद शमी, नॅथन एलिस, आदिल रशीद, मुरुगन अश्विन, हरप्रीत ब्रार, मोईसेस हेन्रिक्स, ख्रिस जॉर्डन, एडन मार्कराम, मनदीप सिंग, दर्शन नळकांडे, प्रभुसिमरन सिंग, रवी बिष्णोई, उत्कर्ष सिंह, फॅबियन एलन, सौरभ कुमार, जलज सक्सेना.

  First published:
  top videos

   Tags: Ipl, IPL 2021, Mumbai Indians