• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021, MI vs KKR : रोहित-हार्दिक खेळणार का नाही? बोल्टने दिली Update

IPL 2021, MI vs KKR : रोहित-हार्दिक खेळणार का नाही? बोल्टने दिली Update

आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) होणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) खेळणार का नाही?

 • Share this:
  अबु धाबी, 23 सप्टेंबर : आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) होणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) खेळणार का नाही? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मुंबईचा फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) यालादेखील हाच प्रश्न विचारण्यात आला. बोल्ट याने मात्र फारसं समाधानकारक उत्तर दिलं नाही. हे दोघंही दुखापतीतून बरे होत असल्याचं बोल्टने सांगितलं. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या मॅचमध्ये हे दोघं छोट्या दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात मुंबईचा 20 रनने पराभव झाला होता. हे दोन्ही खेळाडू निवडीसाठी उपलब्ध होते, पण आम्ही त्यांना विश्रांती द्यायचं ठरवलं, असं मुंबईचे हेड कोच महेला जयवर्धने म्हणाले होते. 'ते दोघंही दुखापतीतून बरे होत आहेत. पुढच्या सामन्यासाठी ते निवडीसाठी उपलब्ध असतील का नाही, याबाबत मी स्पष्ट सांगू शकत नाही. पण प्रत्येक दिवशी त्यांची दुखापत बरी होत आहे,' असं बोल्ट ऑनलाईन पत्रकार परिषदेत म्हणाला.
  'रोहित आणि हार्दिक मुंबईसाठी महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्यांचं टीममध्ये पुनरागमन व्हावं, म्हणून आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत. पुढच्या दोन सामन्यांमध्ये ते निवडीसाठी उपलब्ध होतील,' असा विश्वास बोल्टने व्यक्त केला. बोल्टने रोहित शर्माला आराम देण्याच्या निर्णयाचंही समर्थन केलं. 'रोहितकडे अनुभव आहे आणि त्याने या फॉरमॅटमध्ये रनही केले आहेत. त्याची पोकळी भरून काढणं अशक्य आहे. भविष्यामध्ये खूप क्रिकेट खेळायचं आहे, त्यामुळे तो 100 टक्के फिट असणं गरजेचं आहे,' अशी प्रतिक्रिया बोल्टने दिली. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं कोलकात्याविरुद्धचं रेकॉर्ड धमाकेदार आहे, पण या फॉरमॅटमध्ये इतिहासाला काही अर्थ नाही, असं स्पष्ट मत बोल्टने मांडलं. प्रत्येक सामन्यात नव्याने सुरुवात करावी लागते. प्रत्येक मॅच महत्त्वाची असते. त्यांच्याविरुद्धचं आमचं रेकॉर्ड चांगलं असलं, तरी त्यांची टीम चांगली आहे. आम्ही त्यांना हलक्यात घेणार नाही, असं वक्तव्य बोल्टने केलं.
  Published by:Shreyas
  First published: