Home /News /sport /

MI vs KKR: मुंबईने फिरवला हरलेला सामना, रोहित शर्माने सांगितलं काय आहे सिक्रेट

MI vs KKR: मुंबईने फिरवला हरलेला सामना, रोहित शर्माने सांगितलं काय आहे सिक्रेट

IPL 2021: आयपीएल टी-20 (IPL 2021) क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध (MI) कोलकाता नाइट रायडर्स (KKR) असा रोमांचक सामना झाला.

मुंबई, 14 एप्रिल: आयपीएल टी-20 (IPL 2021) क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध (MI) कोलकाता नाइट रायडर्स (KKR) असा रोमांचक सामना झाला. कोलकात्याचा कर्णधार इऑन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंग करताना मुंबई संघाने फारशी चांगली धावसंख्या उभारली नाही. एकामागे एक चांगले फलंदाज बाद होत गेल्यामुळे मुंबई संघाने 20 ओव्हरमध्ये अवघ्या 152 धावा केल्या. 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याचा संघ 20 ओव्हरमध्ये 7 बाद 142 धावांवर बाद झाला. कमी धावसंख्येमुळे मुंबई संघ पराभवाच्या छायेत होता पण त्यांनी जबरदस्त बॉलिंगच्या जोरावर विजय संपादन केला. मॅच नंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने याबद्दल खुलासा केला. विजयाचं श्रेय बॉलर्सना – रोहित रोहित म्हणाला, ‘आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूने चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं. साधारणपणे प्रत्येक मॅचमध्ये असं घडत नाही. हा सामना जिंकल्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढला आहे. केकेआरने पॉवरप्लेमध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. राहुलने मधल्या टप्प्यात आम्हाला महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. क्रुणालनी शेवटी टाकलेल्या ओव्हरमुळेही विजयात मोलाची मदत झाली. या विजयाचं संपूर्ण श्रेय बॉलर्सना जातं.’ (हे वाचा-IPL 2021 : ऋषभ पंतचे हे दोन फोटो दाखवतायत त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास) 'सूर्यकुमारचा फॉर्म कायम' चेन्नईतल्या विकेटबद्दल रोहित म्हणाला,  ‘चेन्नईच्या पिचवर पहिल्या बॉलपासून हिटिंग करता येत नाही. नियोजनपूर्वक खेळावं लागतं. आम्ही अपेक्षेपेक्षा 15-20 रन कमी केल्या. शेवटी आमची बॅटिंग नीट झाली. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपला फॉर्म जबरदस्त राखला आहे. तो निर्भयपणे खेळतो आणि सुरुवातीच्या ओव्हरमध्ये तो असं खेळतो हे आमच्यासाठी चांगलंच आहे. आम्हाला सलामीला उत्तम बॅट्समनची गरज होती आणि सूर्यकुमार ते करत आहे. ही मॅच जिंकणं हा संपूर्ण टीम एफर्ट होता. यापुढे विकेट समजून घेऊन आम्हाला खेळावं लागेल. ’ (हे वाचा-पाकिस्तानी क्रिकेटपटूचा झिम्बाब्वेला जायला नकार, कारण ऐकून हैराण व्हाल!) या आधीच्या काही आयपीएल स्पर्धांत मुंबई इंडियन्सचा सुरुवातीचे काही सामने हरून नंतर कामगिरी उंचावण्याच रेकॉर्ड आहे. त्यामुळे  मंगळवारी झालेल्या सामन्यात हा संघ पराभवाच्या छायेत असताना सर्व क्रिकेटप्रेमी हे गृहितच धरून चालले होते की मुंबईचा पराभव निश्चित आहे. कोलकाताच्या बॉलर्सनी त्यांना रोखलं होतं आणि त्यांचे बॅट्समन मुंबईने दिलेलं 153 धावांचं लक्ष्य सहज पार करतील असंच सगळ्यांना वाटत होतं. पण मुंबईच्या बॉलर्सनी पारडं फिरवून टाकलं आणि विजय नोंदवला. या आयपीएलमधील पहिला विजय त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: IPL 2021, Rohit sharma, Suryakumar yadav

पुढील बातम्या