मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : मुंबईसाठी 'दिल्ली' दूरच, Play Off मध्ये पोहोचण्याचं स्वप्न झालं आणखी धूसर

IPL 2021 : मुंबईसाठी 'दिल्ली' दूरच, Play Off मध्ये पोहोचण्याचं स्वप्न झालं आणखी धूसर

आयपपीएल स्पर्धेत शनिवारचा दिवस डबल हेडरचा आहे. यामधील पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यात होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

शारजाह, 2 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅट्समनची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा (DC vs MI) 4 विकेटने पराभव झाला आहे. याचसोबत मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न आणखी धूसर झालं आहे. मुंबईने ठेवलेल्या 130 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीलाही संघर्ष करावा लागला. 20 व्या ओव्हरमध्ये त्यांना विजयासाठी 4 रनची गरज होती, तेव्हा अश्विनने फोर मारून सिक्स मारून दिल्लीला जिंकवून दिलं. एका बाजूने दिल्लीच्या विकेट जात असताना श्रेयस अय्यरने संयमी खेळी केली. अय्यर 33 रनवर नाबाद राहिला. तर अश्विननेही नाबाद 21 रनची खेळी केली. मुंबईकडून बुमराह, बोल्ट, कुल्टर नाईल, जयंत यादव आणि कृणाल पांड्या यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

दिल्लीने या सामन्यात मुंबईला टॉस जिंकून पहिले बॅटिंगला बोलावलं, यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून फक्त 129 रनच करता आले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सर्वाधिक 33 रन केले. याशिवाय इतर बॅट्समनना सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठा स्कोअर करता आला नाही. दिल्लीकडून आवेश खान (Avesh Khan) आणि अक्सर पटेल (Axar Patel) यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या. तर नॉर्किया आणि अश्विनला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

प्ले-ऑफला पोहोचणं झालं कठीण

या पराभवासोबतच मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचणं आणखी कठीण झालं आहे. उरलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला तरी ते 14 पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकतात. तसंच मुंबईचा नेट रन रेटही सगळ्यात खराब आहे, त्यामुळे त्यांना पुढच्या दोन मॅच फक्त जिंकाव्याच नाही, तर मोठ्या फरकाने जिंकाव्या लागणार आहेत. याचसोबत त्यांना इतर टीमच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे.

First published:

Tags: Delhi capitals, IPL 2021, Mumbai Indians