चेन्नई, 20 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबईला दुसरा पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा (Mumbai Indians vs Delhi Capitals) 6 विकेटने पराभव झाला. टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेतल्यानंतर मुंबईच्या बॅट्समननी निराशा केली. 20 ओव्हरमध्ये त्यांना फक्त 137 रन करता आले, पण मुंबईच्या बॉलरनी एवढं छोटं आव्हान असतानाही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचली. दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक 45 रन केले, तर स्मिथने 33 रनची खेळी केली. ललित यादव 22 रनवर आणि शिमरन हेटमायर 14 रनवर नाबाद राहिला. मुंबईकडून जयंत यादव, बुमराह, राहुल चहर आणि कायरन पोलार्डला एक विकेट मिळाली.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅट्समनची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. दिल्लीविरुद्धच्या (Delhi Capitals) सामन्यामध्ये मुंबईला 20 ओव्हर खेळून 137 रन करता आल्या. यंदाच्या मोसमातला मुंबईचा हा निचांकी स्कोअर आहे. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 44 रन केले, तर सूर्यकुमार यादवने 24, इशान किशनने 26 आणि जयंत यादवने 23 रन केले. दिल्लीकडून अमित मिश्राला सर्वाधिक 4 विकेट मिळाल्या, तर आवेश खानने 2 विकेट घेतल्या. मार्कस स्टॉयनिस, कगिसो रबाडा आणि ललित यादवला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. मुंबईने टीममध्ये एक बदल केला. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर एडम मिल्नेच्या (Adam Milne) ऐवजी टीममध्ये ऑफ स्पिनर जयंत यादवला (Jayant Yadav) संधी देण्यात आली. फक्त तीन परदेशी खेळाडू घेऊन मुंबई या सामन्यात उतरली आहे. आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक टीम जास्तीत जास्त चार परदेशी खेळाडू घेऊन खेळू शकते. दुसरीकडे दिल्लीनेही त्यांच्या टीममध्ये दोन बदल केले. शिमरन हेटमायर आणि अमित मिश्रा यांचं टीममध्ये पुनरागमन झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, IPL 2021, Mumbai Indians, Rishabh pant, Rohit sharma