मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : शांत ट्रेन्ट बोल्ट कृणालवर भडकला, मैदानातच दिली शिवी, Video Viral

IPL 2021 : शांत ट्रेन्ट बोल्ट कृणालवर भडकला, मैदानातच दिली शिवी, Video Viral

चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या सामन्यात शनिवारी मुंबई इंडियन्सचा (CSK vs Mumbai Indians) रोमांचक विजय झाला. कायरन पोलार्ड (Kieron Pollard) हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या सामन्यात कायमच शांत असणाऱ्या ट्रेन्ट बोल्टचाही (Trent Boult) पारा चढल्याचं पाहायला मिळालं, खराब फिल्डिंग केल्यानंतर बोल्ट कृणाल पांड्यावर (Krunal Pandya) भडकला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
नवी दिल्ली, 2 मे : चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या सामन्यात शनिवारी मुंबई इंडियन्सचा (CSK vs Mumbai Indians) रोमांचक विजय झाला. कायरन पोलार्ड (Kieron Pollard) हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पोलार्डने 34 बॉलमध्ये 87 रनची अफलातून खेळी केली, यामध्ये 8 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. या वादळी खेळीआधी पोलार्डने बॉलिंगमध्येही चमक दाखवली 2 ओव्हरमध्ये 12 रन देऊन त्याने 2 विकेट घेतल्या. डुप्लेसिस आणि रैना या दोघांची विकेट पोलार्डने घेतली. एकीकडे मुंबईच्या दिग्गज बॉलर्सची चेन्नईचे बॅट्समन धुलाई करत असताना पोलार्डने मात्र शानदार कामगिरी केली. बुमराहने 4 ओव्हरमध्ये 56 रन देऊन 1 विकेट घेतली, तर बोल्टने 4 ओव्हरमध्ये 42 रन देऊन 1 विकेट घेतली. चेन्नईच्या बॅट्समनकडून होत असलेल्या धुलाईनंतर कायमच शांत असणाऱ्या ट्रेन्ट बोल्टचाही (Trent Boult) राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर बोल्टने ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) माघारी पाठवलं. पहिली विकेट गेल्यानंतर मोईन अली (Moeen Ali) आणि फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) मुंबईच्या बॉलर्सवर आक्रमण केलं. बुमराहचीही धुलाई सुरू असल्यामुळे रोहितने सहाव्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा बोल्टच्या हातात बॉल दिला. बोल्टने टाकलेला बॉल मोईन अलीने डीप मीड विकेट आणि फाईन लेगच्या मधून मारला. तेव्हा डीप मिड विकेटवर उभा असलेला कृणाल बॉल अडवण्यासाठी धावत आला, पण त्याच्याकडून बॉल सुटला आणि बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेला. कृणाल पांड्याची (Krunal Pandya) खराब फिल्डिंग पाहून ट्रेन्ट बोल्ट संतापला एवढंच नाही तर त्याच्या तोंडातून शिवीही निघाली. बोल्टचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तसंच अनेकांनी कृणाल पांड्याला त्याच्याच औषधाचा डोस मिळाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. आयपीएलच्या या मोसमात अनेकवेळा कृणाल पांड्या मुंबईच्या फिल्डर्सवर संतापल्याचं अनेकवेळा पाहायला मिळालं. चेन्नई सुपरकिंग्सने या सामन्यात मुंबईला 219 रनचं आव्हान दिलं. अंबाती रायुडूने 27 बॉलमध्ये नाबाद 72 रन केले, यामध्ये 7 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. तर फाफ डुप्लेसिसने 28 बॉलमध्ये 50 रन आणि मोईन अलीने 36 बॉलमध्ये 58 रनची खेळी केली. एवढे रन करूनही पोलार्डच्या वादळी खेळीमुळे मुंबईने चेन्नईला धूळ चारली.
First published:

Tags: Cricket, Csk, IPL 2021, Mumbai Indians

पुढील बातम्या