मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: मुंबई विरुद्ध पराभूत झाल्यानं शांत धोनीही संतापला, 'या' खेळाडूंवर ठेवला ठपका

IPL 2021: मुंबई विरुद्ध पराभूत झाल्यानं शांत धोनीही संतापला, 'या' खेळाडूंवर ठेवला ठपका

मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठी धावसंख्या उभारुनही पराभव झाल्यानं चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) नाराज झाला आहे. या पराभवानंतर धोनीनं ही नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

    नवी दिल्ली, 2 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) ही आयपीएलमधील ब्लॉकबस्टर लढत शनिवारी झाली. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये मुंबईनं चेन्नईचा 4 विकेट्सनं पराभव केला. चेन्नईनं पहिल्यांदा बॅटींग करताना मुंबईसमोर 219 रनचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईनं हे आव्हान कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याच्या आक्रमक खेळाच्या जोरावर पार केलं. पोलार्डनं फक्त 34 बॉलमध्ये 6 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीनं नाबाद 87 रन केले. चेन्नईनं या सिझनमध्ये  5 मॅच सलग जिंकल्या होत्या. या 5 मॅचनंतर त्यांना मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभव सहन करावा लागला आहे. मोठी धावसंख्या उभारुनही पराभव झाल्यानं चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) नाराज झाला आहे. या पराभवानंतर धोनीनं ही नाराजी उघडपणे व्यक्त केली. "बॉलिंगपेक्षा आमची फिल्डिंग खराब झाली. आम्ही अगदी मोक्याच्या क्षणी कॅच सोडले. बॉलर्सना देखील अनेकदा योजनेप्रमाणे बॉलिंग करण्यात अपयश आलं. त्यांनी अनेक खराब बॉल टाकले. ही एक मोठी स्पर्धा आहे. आम्ही काही अटीतटीच्या मॅच जिंकतो तर काही हरतो. सध्या तरी आमची नजर पॉईंट टेबलवर नाही. आम्ही एकावेळी एकाच मॅचचा विचार करत आहोत आणि त्या पद्धतीनं तयारी करत आहोत," असं धोनीनं सांगितलं IPL 2021: ब्लॉकबस्टर शनिवार! मुंबई विरुद्ध चेन्नई मॅचला मिळाले तब्बल इतके Views मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये कायरन पोलार्डचा कॅच फाफ ड्यू प्लेसिसनं (Faf du Plessis) सोडला होता. शार्दुल ठाकूरच्या बॉलिंगवर (Shardul Thakur) 18 व्या ओव्हरमध्ये त्यानं हा कॅच सोडला. ड्यू प्लेसिस हा चेन्नईचाच नाही तर जगातील सर्वोत्तम फिल्डरपैकी एक आहे. त्यानं सोडलेला हा कॅच चेन्नईच्या पराभवात निर्णयाक ठरला. भरवशाच्या फिल्डरनंच कॅच सोडल्यानं निराश झालेल्या धोनीनं त्याची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, Mumbai Indians

    पुढील बातम्या