• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • MI vs CSK: मुंबई-चेन्नईचं 'झारखंड कनेक्शन'! धोनी देतोय प्रतिस्पर्धी खेळाडूंना खास टीप्स

MI vs CSK: मुंबई-चेन्नईचं 'झारखंड कनेक्शन'! धोनी देतोय प्रतिस्पर्धी खेळाडूंना खास टीप्स

19 सप्टेंबरच्या मॅचमध्ये धोनीच्या नेतृत्वाखालच्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings vs Mumbai Indians) टीमने मुंबई इंडियन्स टीमचा 20 रन्सनी पराभव केला. या मॅचनंतरचा धोनीचा एक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:
मुंबई, 21 सप्टेंबर: महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni Latest News) म्हटलं तकी त्याची मॅनेजमेंट, त्याचा कॉन्फिडन्स आणि स्पोर्ट स्पिरीट या सगळ्या बाबी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. म्हणूनच त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. यंदाच्या आयपीएलचं दुसरं पर्व (UAE IPL 2021 Updates) दुबईत नुकतंच सुरू झालं आहे. 19 सप्टेंबरच्या मॅचमध्ये धोनीच्या नेतृत्वाखालच्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings vs Mumbai Indians) टीमने मुंबई इंडियन्स टीमचा 20 रन्सनी पराभव केला. या मॅचनंतरचा धोनीचा एक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात तो दोन खेळाडूंशी बोलताना दिसतो आहे. आता तुम्ही म्हणाल, की त्यात काय विशेष? पण ते दोन्ही खेळाडू त्याच्या प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स टीमचे आहेत. मुंबई इंडियन्स टीमने 'दी झारखंड कनेक्शन' अशी कॅप्शन देऊन हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला होता. सीएसकेने देखील त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून धोनीचे फोटो शेअर केले आहेत. ईशान किशन (Ishan Kishan) आणि अनुकूल रॉय (Anukul Roy) या खेळाडूंशी धोनी गप्पा मारत असून धोनीप्रमाणेच ते दोघंही झारखंड राज्यातलेच आहेत. त्यामुळेच धोनी मॅच संपल्यानंतर त्या खेळाडूंशी विशेष आपुलकीने बोलत असून, त्यांना खेळाच्या काही बहुमोल टिप्सही देताना दिसत आहे. त्या गप्पांना मॅचचा संदर्भ आहेच, शिवाय एकंदरीतच क्रिकेटबद्दलचं मार्गदर्शनही आहे. 40 वर्षांच्या धोनीचा हाच गुण सर्वांना आवडतो. अनुभवी खेळाडूंनी नव्या खेळाडूंना, नव्या रक्ताला प्रोत्साहन देणं, पाठबळ देणं, मार्गदर्शन करणं हे एकंदर खेळाच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असतं. त्याचंच चित्र या निमित्ताने पाहायला मिळालं. मुंबई इंडियन्स टीमचा 23 वर्षांचा डावखुरा बॅट्समन किशन याला आउट करण्यासाठी त्या मॅचमध्ये धोनीने सापळा रचला होता. त्याच्या वरच्या ड्राइव्हसाठी त्याने जवळ फिल्डरची योजना केली होती. किशन त्या जाळ्यात अगदी अलगद सापडला होता. अनुकूल रॉय अद्याप मुंबई-इंडियन्सच्या राखीव खेळाडूंमध्ये असून, त्याला अद्याप ब्रेक मिळायचा आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धची चेन्नई सुपर किंग्जची ती मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत खूपच रंजक झाली; मात्र अखेर चेन्नईनेच बाजी मारली. मुंबई इंडियन्सची पुढची मॅच 23 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे कोलकाता नाइड रायडर्स टीमविरुद्ध खेळली जाणार आहे. तसंच, चेन्नई सुपर किंग्ज टीमची पुढची मॅच विराट कोहलीच्या नेतृत्वाखालच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या टीमविरुद्ध 24 सप्टेंबर रोजी होणार आहे. आयपीएल 2021मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालची चेन्नई सुपर किंग्ज ही टीम 12 गुणांसह अव्वल स्थानी आहे.
First published: