मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : स्पिरीट ऑफ क्रिकेट कुठे आहे?, मुंबईच्या त्या कृतीवर क्रिकेटपटूचा संताप

IPL 2021 : स्पिरीट ऑफ क्रिकेट कुठे आहे?, मुंबईच्या त्या कृतीवर क्रिकेटपटूचा संताप

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या (IPL 2021) सगळ्यात रोमांचक सामन्याचा अनुभव शनिवारी प्रेक्षकांनी घेतला. मुंबई आणि चेन्नई (Mumbai Indians vs CSK) यांच्यात झालेल्या या सामन्यात मुंबईचा विजय झाला, पण धवल कुलकर्णीने (Dhawal Kulkarni) केलेल्या कृतीमुळे त्याच्यावर टीका करण्यात येत आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 2 मे : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या (IPL 2021) सगळ्यात रोमांचक सामन्याचा अनुभव शनिवारी प्रेक्षकांनी घेतला. मुंबई आणि चेन्नई (Mumbai Indians vs CSK) यांच्यात झालेल्या या सामन्यात मुंबईला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 2 रनची गरज होती आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) स्ट्राईकवर होता. या बॉलवर पोलार्डने 2 रन काढून मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईने आयपीएल इतिहासात पहिल्यांदाचं एवढं मोठं आव्हान यशस्वीरित्या पार केलं. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) स्वस्तात माघारी पाठवलं, पण फाफ डुप्लेसिस (Faf du Plessis) आणि मोईन अली (Moeen Ali) यांनी मुंबईच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. या दोघांनी 61 बॉलमध्ये 108 रनची पार्टनरशीप केली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) हे मुंबईचे दिग्गज बॉलर अपयशी ठरत असताना कायरन पोलार्डने चेन्नईच्या दोन विकेट घेतल्या. पण अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) 27 बॉलमध्ये 72 रनची वादळी खेळी केली, त्यामुळे चेन्नईने मुंबईला विजयासाठी 219 रनचं आव्हान दिलं. 219 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या मुंबईची सुरूवात धमाकेदार झाली. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक यांनी मुंबईला चांगली सुरुवात करून दिली, पण 13 बॉलमध्येच मुंबईच्या तीन विकेट पडल्या, यानंतर पोलार्डने सूत्र हातात घेतली. पोलार्डने 34 बॉलमध्येच तब्बल 87 रन केले, पण या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या खिलाडूपणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शेवटच्या बॉलवर मुंबईला विजयासाठी 2 रनची गरज होती, तेव्हा नॉन स्ट्रायकरला असलेला धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) बॉल टाकायच्या आधीच क्रीज सोडून धावायला लागला. धवल कुलकर्णीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने (Brad Hogg) स्पिरीट ऑफ क्रिकेट कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. 'शेवटच्या बॉलवर 2 रनची गरज असताना नॉन स्ट्रायकर आधीच पळाला आणि फायदा घेतला. हे स्पिरीट ऑफ द गेममध्ये आहे का?' असं ट्वीट ब्रॅड हॉगने केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Csk, IPL 2021, Kieron pollard, Mumbai Indians

    पुढील बातम्या