• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021, MI vs CSK : 23 व्या वर्षी मुंबईकडून पदार्पण, थेट रोहितचीच जागा घेतली

IPL 2021, MI vs CSK : 23 व्या वर्षी मुंबईकडून पदार्पण, थेट रोहितचीच जागा घेतली

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) यांच्यातल्या मॅचने IPL 2021 च्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) फिट नसल्यामुळे मुंबईला टीममध्ये बदल करावे लागले. अनमोलप्रीत सिंगने (Anmolpreet Singh) या मॅचमधून आयपीएलमध्ये पदार्पण केलं.

 • Share this:
  दुबई, 19 सप्टेंबर : आयपीएल 2021 च्या (IPL 2021) दुसऱ्या राऊंडला सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) यांच्यातल्या मॅचने हा राऊंड सुरू झाला आहे. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण या सामन्याआधीच मुंबईला दोन मोठे धक्के बसले. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) फिट नसल्यामुळे मुंबईला टीममध्ये बदल करावे लागले. अनमोलप्रीत सिंगने (Anmolpreet Singh) या मॅचमधून आयपीएलमध्ये पदार्पण केलं, तर मुंबईचा लकी चार्म असलेल्या सौरभ तिवारीलाही (Surabh Tiwary) संधी देण्यात आली. 23 वर्षांचा अनमोलप्रीत सिंग रोहित शर्माच्याऐवजी मैदानात उतरला. पंजाबकडून प्रथम श्रेणी मॅच खेळणाऱ्या अनमोलप्रीतचं रेकॉर्डही चांगलं आहे. 27 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 44 च्या सरासरीने अनमोलप्रीतने 1,691 रन केल्या, यात 5 शतकं आणि 8 अर्धशतकं आहेत. मुंबईने उतरवलं 'सरप्राईज पॅकेज'! चेन्नईला बसला जोरदार झटका अनमोलप्रीत 2015 साली भारताकडून अंडर-19 वर्ल्ड कपही खेळला. सेमीफायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने 72 रनची खेळी केली आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. यानंतर आपल्या खेळाच्या जोरावर तो इंडिया-एमध्येही आला. अनमोलप्रीत पंजाबच्या पटियालाचा आहे. 19 व्या वर्षीच त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हा त्याने 125 पेक्षा जास्तच्या सरासरीने 753 रन केले होते. 2017-18 साली त्याने हिमाचल प्रदेशविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी केली. अनमोलप्रीतने 33 टी-20 मध्ये 485 रन केले. बॅटिंगसोबतच तो ऑफ स्पिन बॉलिंगही करतो. पहिल्या 10 मिनिटांमध्येच Mumbai Indiansचे Chennai Super Kingsला दोन धक्के मुंबई इंडियन्सने 2019 साली अनमोलप्रीतला 80 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. यानंतर अनमोलप्रीतला एकदाही खेळायची संधी मिळाली नव्हती, तरी मुंबईने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला टीममध्ये ठेवलं. आता स्वत:ला सिद्ध करण्याची संधी अनमोलप्रीतकडे चालून आली आहे.
  Published by:Shreyas
  First published: