• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IPL 2021 : ...तरच वानखेडे स्टेडियवर मिळणार प्रवेश, नियम आणखी कडक

IPL 2021 : ...तरच वानखेडे स्टेडियवर मिळणार प्रवेश, नियम आणखी कडक

देशात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा कहर झाला आहे. या स्थितीमध्येही आयपीएल 2021 (IPL 2021) ला सुरुवात झालेली आहे. पण, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय (BCCI) सतर्क झाली आहे.

  • Share this:
मुंबई, 10 एप्रिल : देशात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा कहर झाला आहे. या स्थितीमध्येही आयपीएल 2021 (IPL 2021)  ला सुरुवात झालेली आहे. पण, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय (BCCI) सतर्क झाली आहे. त्यामुळे सर्व मॅचेस स्टेडियमवर विनाप्रेक्षक खेळवल्या जाणार आहेत. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आपल्या सर्व सदस्यांना वानखेडे स्टेडियमवर मॅच बघण्यासाठी येणार असाल, तर कोविड-19 साठीच्या आरटी पीसीआर टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असला पाहिजे अशी अट घातली आहे. हा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. एमसीएने सर्व सदस्यांपर्यंत ही माहिती पोहोचवली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या या हंगामातील 10 मॅचेस खेळल्या जाणार आहेत. याची सुरुवात शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील मॅचने झाली आहे. एमसीएचे सचिव संजीव नाईक यांनी सर्व सदस्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार सर्व अधिकृत प्रतिनिधी जे वानखेडे स्टेडियमवर आयपीएल मॅचेस पाहू इच्छितात, त्यांची कोविड19 साठीची आरटी पीसीआर टेस्ट (RT-PCR Test)निगेटिव्ह आली पाहिजे. मॅच पाहण्यासाठी जेव्हा स्टेडियममध्ये याल त्यावेळी तसा रिपोर्ट दाखवणं बंधनकारक आहे. हा रिपोर्ट मॅच पूर्वी 48 तासांच्या आतील असणं गरजेचं आहे. ज्या सदस्यांनी नुकतीच कोरोना लस घेतली आहे,त्यांचा देखील रिपोर्ट निगेटिव्ह असला पाहिजे. सर्व सदस्यांना मॅचच्या दिवशी स्टेडियमवर प्रवेश करण्यापूर्वी हा रिपोर्ट दाखवणं अनिवार्य आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना अशी विनंती आहे की मॅच पाहण्यासाठी येताना निगेटिव्ह रिपोर्ट सोबत घेऊन यावा. वानखेडे स्टेडियमवरील डझनभर कर्मचारी होते कोरोना बाधित यापूर्वी वानखेडे स्टेडियमवरील 12 कर्मचारी आणि तेथे काम करणाऱ्या एक प्लंबरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना स्टेडियम शेजारी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. काही दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. सध्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा मोठा प्रभाव पाहायला मिळत आहे. एकट्या मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाखांवर गेली आहे. 24 तासांपूर्वी येथे 9 हजारांवर केसेस नव्याने पाहायला मिळाल्या आहेत. मुंबईतील मृतांचा आकडा 11 हजारांवर पोहोचला आहे. ही स्थिती पाहता राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. जर परिस्थिती सुधारली नाही तर लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.
First published: