• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IPL 2021, KKR vs CSK : कोलकातानं टॉस जिंकला,चेन्नईच्या टीममध्ये 'चॅम्पियन' नाही

IPL 2021, KKR vs CSK : कोलकातानं टॉस जिंकला,चेन्नईच्या टीममध्ये 'चॅम्पियन' नाही

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेत रविवारचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (KKR vs CSK) यांच्यात होत आहे. या दोन्ही टीमनं सेकंड हाफमधील पहिले दोन्ही सामने जिंकत जोरदार सुरुवात केली आहे.

  • Share this:
    अबु धाबी, 26 सप्टेंबर : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेत रविवारचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (KKR vs CSK) यांच्यात होत आहे. या दोन्ही टीमनं सेकंड हाफमधील पहिले दोन्ही सामने जिंकत जोरदार सुरुवात केली आहे. आता विजयाची ही मालिका कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. चेन्नईनं या स्पर्धेत  9 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 14 पॉईंट्ससह ती टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सनं 9 पैकी 4 सामने जिंकले असून ही टीम सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. चेन्नईनं हा सामना जिंकल्यास त्यांची 'प्ले ऑफ'  मधील जागा नक्की होईल. तर कोलकाता नाईट रायडर्सनं 9 पैकी 4 सामने जिंकले असून ही टीम सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. हा सामना जिंकून 'प्ले ऑफ'ची दावेदारी मजबूत करण्याचा केकेआरचा प्रयत्न असेल. KKR vs CSK, Dream 11 Team Prediction: 'हे' 11 जण बदलतील तुमचं नशीब  या मॅचमध्ये  कॅप्टन याने टॉस जिंकून कोलकाताचा कॅप्टन मॉर्गननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. या मॅचसाठी कोलकातानं टीममध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. तर चेन्नई सुपर किंग्सनं एक बदल केलाय. मागच्या मॅचमधील 'मॅन ऑफ द मॅच' ड्वेन ब्राव्होला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी सॅम करनचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही टीमची Playing 11 KKR : शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी  नितिश राणा, इयन मॉर्गन (कॅप्टन), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, सुनील नरीन, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा CSK : फाफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), रविंद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकूल, दीपक चहर आणि जोश हेजलवूड
    Published by:News18 Desk
    First published: