IPL 2021 : 10 अर्धशतकांमध्ये 8 पराभव, मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबाद या खेळाडूला बाहेर बसवणार!

IPL 2021 : 10 अर्धशतकांमध्ये 8 पराभव, मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबाद या खेळाडूला बाहेर बसवणार!

आयपीएलमध्ये (IPL 2021) आज मुंबई इंडियन्सचा सामना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध (Mumbai Indians vs SRH) होणार आहे. या सामन्यात मनिष पांडेसारख्या (Manish Pandey) महत्त्वाच्या खेळाडूला टीममध्ये ठेवायचं का नाही, याबाबतचा कठोर निर्णय हैदराबादला घ्यावा लागणार आहे.

  • Share this:

चेन्नई, 17 एप्रिल : आयपीएलमध्ये (IPL 2021) आज मुंबई इंडियन्सचा सामना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध (Mumbai Indians vs SRH) होणार आहे. या सामन्यात मनिष पांडेसारख्या (Manish Pandey) महत्त्वाच्या खेळाडूला टीममध्ये ठेवायचं का नाही, याबाबतचा कठोर निर्णय हैदराबादला घ्यावा लागणार आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून खेळणाऱ्या मनिष पांडेला 148 मॅचचा अनुभव आहे, पण हैदराबादच्या लागोपाठ दोन पराभवाला मनिष पांडे जबाबदार असल्याची टीका होत आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन्ही सामन्यात मनिष पांडेने चांगली सुरुवात केली, पण त्याला मॅच संपवण्यात अपयश आलं. मनिष पांडेच्या संथ बॅटिंगचं नुकसान हैदराबादला झालं.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (KKR) चेन्नईत झालेल्या सामन्यात मनिष पांडेने 44 बॉलमध्ये 61 रन केले, शेवटच्या बॉलपर्यंत पांडे क्रीजवर होता, पण हैदराबादला 188 रनचं आव्हान पार करता आलं नाही. यानंतर बँगलोरविरुद्धच्या (RCB) सामन्यातही मनिष पांडेने 38 बॉलमध्ये 39 रनची खेळी केली, पण टीमला 150 रनचं आव्हानही पूर्ण करता आलं नाही.

भारतीय क्रिकेटचा भविष्यातला स्टार खेळाडू म्हणून मनिष पांडेकडे पाहिलं जात होतं. भारताकडून त्याने 26 वनडे आणि 39 टी-20 सामनेही खेळले, पण तरीही त्याला भारतीय टीममध्ये स्वत:ची जागा पक्की करता आली नाही. यावर्षी बीसीसीआयच्या करारामधूनही पांडेला बाहेर ठेवण्यात आलं.

आयपीएलच्या मागच्या तीन वर्षातली मनिष पांडेची कामगिरी निराशाजनक झाली आहे. 2018 पासून आतापर्यंत 14 वेळा मनिष पांडेने 30 किंवा त्यापेक्षा अधिक रन केल्या आहेत, यापैकी 11 वेळा हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय मागच्या चार मोसमात मनिष पांडेने 10 वेळा अर्धशतक केलं, यातल्या 8 मॅचमध्ये हैदरबादचा पराभव झाला. मनिष पांडे रन करण्यात यशस्वी होत असला, तरी त्याला टीमला मॅच जिंकवून देता येत नसल्याचं या आकड्यांवरून दिसत आहे.

मनिष पांडेने 148 आयपीएल सामन्यांमध्ये 30.33 च्या सरासरीने आतापर्यंत 3,367 रन केले आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि 19 अर्धशतकंही आहेत, पण त्याने फक्त 121.6 च्या स्ट्राईक रेटने रन केले आहेत. आयपीएलमध्ये 3 हजार पेक्षा जास्त रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये अजिंक्य रहाणेनंतर (Ajinkya Rahane) मनिष पांडेचा स्ट्राईक रेट खराब आहे.

Published by: Shreyas
First published: April 17, 2021, 4:24 PM IST

ताज्या बातम्या