Home /News /sport /

IPL 2021 SRH vs KKR : मनिष पांडेचं नाबाद अर्धशतक व्यर्थ, कोलकात्याचा विजय

IPL 2021 SRH vs KKR : मनिष पांडेचं नाबाद अर्धशतक व्यर्थ, कोलकात्याचा विजय

नितीश राणा (Nitish Rana) आणि राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादला (KKR vs SRH) विजयासाठी 188 रनचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला.

पुढे वाचा ...
    चेन्नई, 11 एप्रिल : मनिष पांडे (Manish Pandey) आणि जॉनी बेयरस्टोच्या (Jonny Bairstow) अर्धशतकानंतरही सनरायजर्स हैदराबादचा कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (SRH vs KKR) सामन्यात 10 रनने पराभव झाला आहे. कोलकात्याने दिलेलं 188 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 177-5 पर्यंतच मजल मारता आली. हैदराबादकडून मनिष पांडेने 44 बॉलमध्ये नाबाद 61 रन केले, तर जॉनी बेयरस्टोने 40 बॉलमध्ये 55 रन केले. कोलकात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने 2 विकेट घेतल्या, तर शाकीब अल हसन, पॅट कमिन्स, आंद्रे रसेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. नितीश राणा (Nitish Rana) आणि राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादला (KKR vs SRH) विजयासाठी 188 रनचं आव्हान दिलं होतं. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या नितीश राणा आणि शुभमन गिल यांनी कोलकात्याला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये 7 ओव्हरमध्ये 53 रनची पार्टनरशीप झाली, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या राहुल त्रिपाठीनेही नितीश राणाला चांगली साथ दिली. राणाने 56 बॉलमध्ये 80 रन केले, यात 9 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर राहुल त्रिपाठीने 29 बॉलमध्ये 53 रनची खेळी केली, त्याने 5 फोर आणि 2 सिक्स मारले. हैदराबादकडून मोहम्मद नबी आणि राशिद खानला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर भुवनेश्वर कुमार आणि नटराजनला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. हैदराबादच्या टीममध्ये वॉर्नरसह बेयरस्टो, मोहम्मद नबी आणि राशिद खान हे परदेशी खेळाडू होते. तर कोलकात्याने इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, शाकीबक अल हसन आणि पॅट कमिन्स या परदेशी खेळाडूंना संधी दिली होती. कोलकात्याकडून टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग पदार्पण केलं. आयपीएलच्या मागच्या दोन मोसमांमध्ये कोलकात्याला नेट रनरेटमुळे प्ले-ऑफ गाठता आली नव्हती, त्यामुळे यावर्षी प्ले-ऑफ गाठण्यासाठी मॅच जिंकण्यासोबतच नेट रनरेट चांगला ठेवण्याचं आव्हान त्यांच्यापुढे असेल, तर दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादने मागच्या मोसमात चांगल्या नेट रनरेटमुळे प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, KKR, SRH

    पुढील बातम्या