सगळ्यात अनलकी खेळाडू, दोनदा टीम इंडियात निवड होऊन माघार, आता कोरोनामुळे IPL वरच संकट

सगळ्यात अनलकी खेळाडू, दोनदा टीम इंडियात निवड होऊन माघार, आता कोरोनामुळे IPL वरच संकट

कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल (IPL 2021) संकटात सापडली आहे. वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) या कोलकात्याच्या दोन्ही खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Virus) आली आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 3 मे : कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल (IPL 2021) संकटात सापडली आहे. वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) या कोलकात्याच्या दोन्ही खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Virus) आली आहे. यानंतर कोलकाता आणि बँगलोर (KKR vs RCB) यांच्यातला सामना पुढे ढकलण्यात आला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार खांद्याच्या स्कॅनिंगसाठी वरुण चक्रवर्तीला बायो-बबलच्या बाहेर नेण्यात आलं, पण तो ग्रीन चॅनलच्या माध्यमातून स्कॅनिंगसाठी गेला होता, तिकडे त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वरुण चक्रवर्तीसाठी मागचे सहा महिने दुर्दैवी ठरले. युएईमधली आयपीएल गाजवल्यानंतर वरुण चक्रवर्तीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली होती, पण भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायच्या तीन दिवस आधी वरुण चक्रवर्तीच्या खांद्याला दुखापत झाली, त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागली, त्याच्याऐवजी टी नटराजन याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठीही वरुण चक्रवर्तीची निवड झाली, पण फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्यामुळे वरुण चक्रवर्तीला इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमधूनही काढता पाय घ्यावा लागला. यानंतर आता वरुणला कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण आयपीएलवरच संकट ओढावलं आहे, त्यामुळे मागचे 6 महिने वरुणसाठी अनलकी ठरले, असंच म्हणावं लागेल.

Published by: Shreyas
First published: May 3, 2021, 6:11 PM IST

ताज्या बातम्या