Home /News /sport /

IPL 2021 : ललित मोदीने 2008 साली केलेली भविष्यवाणी आज खरी ठरली

IPL 2021 : ललित मोदीने 2008 साली केलेली भविष्यवाणी आज खरी ठरली

मागच्या 13 मोसमांमध्ये आयपीएलने (IPL 2021) जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग व्हायचा मान मिळवला. आयपीएल सुरू करण्याचं सगळं श्रेय ललित मोदीला (Lalit Modi) दिलं जातं, पण भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ललित मोदी सध्या इंग्लंडमध्ये आहे.

    मुंबई, 10 एप्रिल : आयपीएलच्या 14 व्या मोसमाला (IPL 2021) कोरोनाच्या संकटात सुरूवात झाली आहे. मागच्या 13 मोसमांमध्ये आयपीएलने जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग व्हायचा मान मिळवला. आयपीएल सुरू करण्याचं सगळं श्रेय ललित मोदीला (Lalit Modi) दिलं जातं, पण भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ललित मोदी सध्या इंग्लंडमध्ये आहे. जगातली सगळ्यात मोठ्या क्रिकेट लीगचा 14 वा मोसम सुरू होण्याआधी ललित मोदी याने एक ट्वीट केलं आहे. 2008 साली आपण केलेली भविष्यवाणी खरी ठरली असं ललित मोदी या ट्वीटमध्ये म्हणाला आहे. आयपीएल ही स्पर्धा मंदीपासून मुक्त असेल, असं मी 2008 साली म्हणालो होतो. आजच्या या काळात हे शब्द खरे ठरत आहेत, असं ट्वीट ललित मोदीने केलं आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यासारख्या दिग्गजांना घेऊन 2008 साली आयपीएलला सुरुवात झाली. फेब्रुवारी 2008 साली आयपीएलच्या लिलाव घेण्यात आला. जेव्हा खेळाडूंचा लिलाव करण्यात आला तेव्हा यावर टीकाही करण्यात आली. पण आज आयपीएलचं यश बघता यावर आता कोणीही प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. आयपीएलची खासियत म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंसोबतच नवोदितांनाही मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळते. एका रात्रीमध्ये हे नवोदित खेळाडू स्टार होतात. हार्दिक पांड्या (Hardik Pandya), कृणाल पांड्या (Krunal Pandya), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), टी नटराजन (T Natrajan), ऋषभ पंत (Rishabh Pant), दीपक चहर (Deepak Chahar), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांच्यासारखे खेळाडू आयपीएलमुळेच टीम इंडियाला मिळाले. याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनीही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून त्यांच्या देशाच्या टीममध्येही पुनरागमन केल्याची उदाहरणं आहेत. 46 हजार कोटींची ब्रॅण्ड व्हॅल्यू आयपीएलची सध्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू जवळपास 46 हजार कोटी रुपये आहे. तर टीममध्ये मुंबई इंडियन्सची ब्रॅण्ड व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे. फक्त आयपीएलमुळेच काही खेळाडूंनी प्रत्येकी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कमावली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, IPL 2021

    पुढील बातम्या