Home /News /sport /

IPL 2021 : ना कोणाचा विश्वास, ना कोण बोलतं, KKR च्या दिग्गजाने आपल्याच टीमवर डागली तोफ

IPL 2021 : ना कोणाचा विश्वास, ना कोण बोलतं, KKR च्या दिग्गजाने आपल्याच टीमवर डागली तोफ

KKR च्या टीमवर त्यांच्याच खेळाडूने केली टीका

KKR च्या टीमवर त्यांच्याच खेळाडूने केली टीका

भारताचा चायनामन स्पिनर कुलदीप यादवसाठी (Kuldeep Yadav) सध्या काहीच ठीक होताना दिसत नाही. भारताच्या टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये (T20 World Cup) कुलदीपचा समावेश झाला नाही. आता तर कुलदीपने त्याची आयपीएल (IPL 2021) टीम कोलकाता नाईट रायडर्सवरच (KKR) टीका केली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 सप्टेंबर : भारताचा चायनामन स्पिनर कुलदीप यादवसाठी (Kuldeep Yadav) सध्या काहीच ठीक होताना दिसत नाही. भारताच्या टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये (T20 World Cup) कुलदीपचा समावेश झाला नाही. आता तर कुलदीपने त्याची आयपीएल (IPL 2021) टीम कोलकाता नाईट रायडर्सवरच (KKR) टीका केली आहे. केकेआर टीम मॅनेजमेंटमधलं कोणीही बोलत नाही, तसंच आपल्या क्षमतेवरही विश्वास दाखवला जात नाही. अनेकवेळा आपण अंतिम 11 खेळाडूंमध्ये आहोत का नाही, तेपण कळत नसल्याचं कुलदीप म्हणाला. कुलदीप यादव भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या (Aakash Chopra) युट्यूब चॅनलवर बोलत होता. 'अनेकवेळा आपण प्लेयिंग 11 मध्ये खेळण्या लायक आहोत असं वाटतं, पण टीममध्ये स्थान मिळत नाही. अनेकवेळा आपण टीमसाठी मॅच जिंकवून देऊ शकतो, असं वाटतं. पण आपण टीममध्ये का नाही, हे कळंतही नाही. टीम मॅनेजमेंट फक्त दोन महिन्यांचं प्लॅनिंग करतं. यात आपल्या भूमिकेविषयी काही कळतही नाही,' असं वक्तव्य कुलदीपने केलं. 'जेव्हा एखादा खेळाडू अंतिम-11 मध्ये नसतो, तेव्हा टीम मॅनेजमेंट त्याच्यासोबत बोलतो, पण केकेआरच्या टीममध्ये असं होत नाही. बॉलर म्हणून आपल्यावर विश्वास दाखवला जात नाही. आयपीएलच्या पहिल्या राऊंडमध्ये मी केकेआरच्या टीम मॅनेजमेंटसोबत मी बोललो, पण कोणीही मला स्पष्टीकरण दिलं नाही,' अशी प्रतिक्रिया कुलदीपने दिली. 'परदेशी खेळाडूच्या तुलनेत भारतीय कॅप्टन असेल, तर त्याच्याकडे जाऊन आपण टीमचा भाग का नाही, हे विचारू शकतो. परदेशी कॅप्टनसोबत असा संवाद होऊ शकत नाही. इयन मॉर्गन (Eoin Morgan) मला कसा बघतो माहिती नाही, त्यामुळे कम्युनिकेशन गॅप वाढते,' असं कुलदीपने सांगितलं. कुलदीप यादव आयपीएल 2021 च्या पहिल्या राऊंडमध्ये एकही मॅच खेळला नाही. मागच्या वर्षी युएईमध्ये जेव्हा आयपीएल खेळवली गेली तेव्हाही त्याला फक्त 5 मॅचमध्येच संधी मिळाली आणि एकच विकेट घेता आली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, KKR, Kuldeep yadav

    पुढील बातम्या