मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा स्टार आयपीएलच्या तीन मोसमात अपयशी, रोहित करणार बाहेर?

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा स्टार आयपीएलच्या तीन मोसमात अपयशी, रोहित करणार बाहेर?

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली. 14 मॅचपैकी 7 मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला, तर त्यांनी 7 मॅच गमावल्या.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 10 ऑक्टोबर : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली. 14 मॅचपैकी 7 मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला, तर त्यांनी 7 मॅच गमावल्या. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई पाचव्या क्रमांकावर राहिली. मुंबई आणि कोलकात्याचे 14 पॉईंट्स होते, पण कोलकात्याचा नेट रनरेट मुंबईपेक्षा चांगला होता, त्यामुळे त्यांचा प्ले-ऑफमध्ये प्रवेश झाला.

मुंबईच्या बॅटिंगने या मोसमात निराशा केली. इशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) अखेरच्या काही सामन्यांमध्ये सूर गवसला, तर हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) बॅटही यावेळी चमकली नाही. पण मुंबई इंडियन्सची सगळ्यात जास्त निराशा केली ती कृणाल पांड्याने (Krunal Pandya) . मागच्या तीन मोसमांपासून कृणाल पांड्याला चमकदार कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे आता पुढच्यावेळी मुंबई त्याला बाहेरचा रस्ता दाखवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कृणाल पांड्याने या मोसमात 13 सामन्यांमध्ये 14.03 च्या बॅटिंग सरासरीने आणि 116.26 च्या स्ट्राईक रेटने 143 रन केल्या, तर त्याला 53 च्या बॉलिंग सरासरीने आणि 7.98 च्या इकोनॉमी रेटने फक्त 5 विकेट घेतल्या. आयपीएलच्या 2019 आणि 2020 च्या मोसमातही कृणालला मोठं यश मिळालं नाही, पण मुंबईने दोन्ही वेळा आयपीएल ट्रॉफी पटकावल्यामुळे कृणालच्या कामगिरीकडे दुर्लक्ष झालं.

कृणालने 2020 साली 16 मॅचमध्ये 18.16 च्या बॅटिंग सरासरीने आणि 118.47 च्या स्ट्राईक रेटने 109 रन केले. तसंच त्याने 63.3 च्या सरासरीने आणि 7.57 च्या इकोनॉमी रेटने 6 विकेट घेतल्या होत्या. 2019 साली कृणालने 16 मॅच खेळल्या, तेव्हा त्याने 16.63 च्या सरासरीने आणि 122 च्या स्ट्राईक रेटने 183 रन केले होते. 2019 च्या मोसमात त्याला 27.9 च्या बॉलिंग सरासरीने आणि 7.28 च्या इकोनॉमी रेटने 12 विकेट मिळाल्या होत्या.

पुढच्या वर्षी लिलाव

आयपीएलच्या पुढच्या मोसमात आयपीएलच्या दोन नव्या टीम वाढणार आहेत. पुढच्या वर्षीच्या मोसमाआधी खेळाडूंचा मेगा ऑक्शन होणार आहे, यासाठी टीमना खेळाडू सोडावे लागणार आहेत. कृणाल पांड्याची मागच्या तीन मोसमांमधली ही कामगिरी बघता कृणालला मुंबईची टीम रिटेन करण्याची शक्यता कमी आहे. तसंच लिलावामध्ये कृणालवर मुंबई पुन्हा बोली लावेल का? हा प्रश्न आहे.

First published:

Tags: IPL 2021, Krunal Pandya, Mumbai Indians