Home /News /sport /

IPL 2021 : ना विराट, ना रोहित, राहुलने 'आपल्याच' महान खेळाडूला दिला धोबीपछाड

IPL 2021 : ना विराट, ना रोहित, राहुलने 'आपल्याच' महान खेळाडूला दिला धोबीपछाड

पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) या आयपीएलमध्येही (IPL 2021) शानदार फॉर्ममध्ये आहे. राहुलने यंदाच्या सिझनमध्येही 500 रनचा टप्पा पार केला आहे. याचसह त्याच्या नावावर लागोपाठ चौथ्या आयपीएलमध्ये 500 रनचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम झाला आहे.

पुढे वाचा ...
    शारजाह, 3 ऑक्टोबर : पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) या आयपीएलमध्येही (IPL 2021) शानदार फॉर्ममध्ये आहे. राहुलने यंदाच्या सिझनमध्येही 500 रनचा टप्पा पार केला आहे. याचसह त्याच्या नावावर लागोपाठ चौथ्या आयपीएलमध्ये 500 रनचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम झाला आहे. लागोपाठ चारवेळा 500 रन केले असले तरी तो पंजाबला आयपीएल ट्रॉफी जिंकवण्यात अपयशी ठरला आहे. राहुलने त्याच्याच पंजाब किंग्समधल्या क्रिस गेलचा (Chris Gayle) लागोपाठ 3 मोसम 500 रन करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. गेल टी-20 क्रिकेटमध्ये 14 हजार रन करणारा एकमेव खेळाडू आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक 6 वेळा 500 रन करण्याचा कारनामा डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. केएल राहुलने 2018 ते 2021 पर्यंत लागोपाठ 4 आयपीएल मोसमांमध्ये 500 पेक्षा जास्त रन केल्या. 2018 साली त्याने 14 मॅचमध्ये 55 च्या सरासरीने 659 रन केले, यात 6 अर्धशतकं होती, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 158 चा होता. 2019 साली त्याने 14 सामन्यांमध्ये 54 च्या सरासरीने 593 रन केले, यात 1 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश होता. 135 च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली होती. 2020 साली त्याने 14 इनिंगमध्ये 56 च्या सरासरीने 670 रन केले आणि एक शतक, 5 अर्धशतकं लगावली. 129 च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली. आयपीएल 2021 मध्ये राहुलच्या 528 रन झाल्या आहेत आणि त्याने 5 अर्धशतकं आहेत. रविवारी आरसीबीविरुद्धच्या सामन्यात राहुल 35 बॉलमध्ये 39 रन करून आऊट झाला. आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत फक्त 2 बॅट्समनना 500 रनचा टप्पा ओलांडता आला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर ऋतुराज गायकवाड 508 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. केएल राहुलने आयपीएलमध्ये 3 हजार रनही पूर्ण केल्या आहेत, यात 2 शतकं आणि 26 अर्धशतकं आहेत. आयपीएलमध्ये त्याचे 125 सिक्सही पूर्ण झाले आहेत. मयंकचीही शानदार कामगिरी मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) आयपीएलच्या लागोपाठ दुसऱ्या मोसमात 400 रनचा टप्पा गाठला आहे. मयंकने या मोसमात 4 अर्धशतकं केली आहेत. आयपीएल 2020 मध्ये मयंकने 11 मॅचमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकंच्या मदतीने 424 रन केल्या होत्या. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल आयपीएलमध्ये पंजाबसाठी ओपनिंग करतात.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, Kl rahul, Punjab kings

    पुढील बातम्या