• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : पहिल्याच सामन्यात धमाका! ...तर IIT किंवा IIM मध्ये असता व्यंकटेश

IPL 2021 : पहिल्याच सामन्यात धमाका! ...तर IIT किंवा IIM मध्ये असता व्यंकटेश

विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीविरुद्ध पहिल्याच सामन्यात कोलकात्याच्या (RCB vs KKR) व्यंकटेश अय्यरने धमाका केला. आरसीबीने दिलेलं 93 रनचं आव्हान केकेआरने शुभमन गिल आणि अय्यरच्या मदतीने 60 बॉल शिल्लक असतानाच एक विकेट गमावून पूर्ण केलं.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर : विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीविरुद्ध पहिल्याच सामन्यात कोलकात्याच्या (RCB vs KKR) व्यंकटेश अय्यरने धमाका केला. आरसीबीने दिलेलं 93 रनचं आव्हान केकेआरने शुभमन गिल आणि अय्यरच्या मदतीने 60 बॉल शिल्लक असतानाच एक विकेट गमावून पूर्ण केलं. व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात 27 बॉलमध्ये नाबाद 41 रन केले. आपण हुशार विद्यार्थी असल्याचं व्यंकटेशने सामना संपल्यानंतर सांगितलं. दक्षिण भारतातल्या कुटुंबामध्ये खेळ हा दुसरा पर्याय असतो. आई-वडील मुलांना शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला सांगतात. माझ्याकडे आईने मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं, असं व्यंकटेश म्हणाला. मध्य प्रदेशकडून ओपनिंग करणाऱ्या 26 वर्षांच्या व्यंकटेशने इतर मुलांप्रमाणेच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकइन्फोशी बोलताना व्यंकटेश म्हणाला, 'मी घरामध्ये पुस्तकांमध्येच असायचो, तेव्हा आई मला बाहेर खेळायला पाठवायची'. सीए आणि बीकॉम डिग्री मिळवण्यासाठी अय्यरने एडमिशनही घेतली होती. 2016 साली त्याने इंटरमीडिएट परीक्षेमध्येही टॉप केलं होतं. त्यावेळी अय्यरकडे क्रिकेट किंवा सीए यापैकी एकच पर्याय होता. सीए फायनल परीक्षा देणं म्हणजे क्रिकेट सोडणं किंवा काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घेणं, पण त्याने क्रिकेट निवडलं. IPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर? व्यंकटेश अय्यरने आधी मध्य प्रदेशच्या सीनियर टीमकडून टी-20 आणि वनडे टीममधून पदार्पण केलं. याशिवाय तो अंडर-23 टीमा कर्णधारही होता. 'मी सीए सोडून एमबीए फायनान्स करण्याचं ठरवलं. एन्ट्रन्स एक्झाममध्ये मला चांगले मार्क मिळाले होते. तसंच चांगल्या कॉलेजमध्येही एडमिशन मिळाली होती. माझे शिक्षक चांगले होते आणि त्यांना क्रिकेट आवडायचं. मी चांगला खेळत आहे हे त्यांना दिसलं, त्यामुळे त्यांनी मला लेक्चरला येण्यापासून सूट दिली, तसंच नोट्सही दिल्या,' अशी प्रतिक्रिया अय्यरने दिली. 'क्रिकेट आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करणं मला फार कठीण गेलं नाही. मी कायमच हुशार विद्यार्थी होतो. मी क्रिकेटपटू नसतो तर आयआयटी किंवा आयआयएमध्ये असतो. 2018 साली मला बँगलोरमध्ये नोकरीही मिळाली होती, पण क्रिकेटसाठी मी ती नोकरी सोडली,' असं वक्तव्य अय्यरने केलं.
  Published by:Shreyas
  First published: