मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : यंदाच्या आयपीएलमधला सगळ्यात भारी कॅच, मिस करू नका, पाहा VIDEO

IPL 2021 : यंदाच्या आयपीएलमधला सगळ्यात भारी कॅच, मिस करू नका, पाहा VIDEO

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला (IPL 2021) सगळ्यात भारी कॅच कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स (KKR vs PBKS) यांच्यातल्या मॅचदरम्यान पाहायला मिळाला. पंजाबचा लेग स्पिनर रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) याने सुनिल नारायणला (Sunil Narine) माघारी पाठवताना हा अफलातून कॅच पकडला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

अहमदाबाद, 26 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला (IPL 2021) सगळ्यात भारी कॅच कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स (KKR vs PBKS) यांच्यातल्या मॅचदरम्यान पाहायला मिळाला. पंजाबचा लेग स्पिनर रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) याने सुनिल नारायणला (Sunil Narine) माघारी पाठवताना हा अफलातून कॅच पकडला. अर्शदीप सिंगच्या (Arshdeep Singh) तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला सुनिल नारायणने मिड विकेटच्या दिशेने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण बिष्णोईने धावत येऊन बॉलवर झटप टाकली. 4 बॉलमध्ये शून्य रन करून नारायण आऊट झाला.

सुनिल नारायणची विकेट गेल्यानंतर कोलकात्याची अवस्था 3 बाद 17 अशी झाली होती. या सामन्यामध्ये कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन याने टॉस जिंकून पंजाबला पहिले बॅटिंगला बोलावलं, कोलकात्याच्या बॉलर्सनी मॉर्गनचा हा निर्णय योग्य ठरवला आणि पंजाबला 123 रनवरच रोखलं. प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर सुनिल नारायण आणि पॅट कमिन्सला प्रत्येकी 2-2 तसंच शिवम मावी आणि वरुण चक्रवर्तीला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

पंजाबकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक 31 रन केले, तर आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्य क्रिस जॉर्डनने 18 बॉलमध्ये जलद 30 रन ची खेळी केली, त्यामुळे पंजाबाल 123 रनपर्यंत पोहोचता आलं.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, KKR, Punjab kings