• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021, KKR vs PBKS : सामना पंजाब-कोलकात्याचा, पण भवितव्य ठरणार मुंबईचं!

IPL 2021, KKR vs PBKS : सामना पंजाब-कोलकात्याचा, पण भवितव्य ठरणार मुंबईचं!

आयपीएल 2021 चा (IPL 2021) मोसम आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. तरीदेखील अजूनपर्यंत प्ले-ऑफमधल्या (IPL Play Offs) 3 टीम निश्चित झाल्या नाहीत. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातला सामना (KKR vs PBKS) फक्त या दोन टीमसाठीच नाही तर मुंबई इंडियन्ससाठीही (Mumbai Indians) महत्त्वाचा आहे.

 • Share this:
  मुंबई, 1 ऑक्टोबर : आयपीएल 2021 चा (IPL 2021) मोसम आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. तरीदेखील अजूनपर्यंत प्ले-ऑफमधल्या (IPL Play Offs) 3 टीम निश्चित झाल्या नाहीत. गुरूवारी चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादचा (CSK vs SRH) पराभव करत प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला. यंदाच्या मोसमात प्ले-ऑफ गाठणारी सीएसके पहिली टीम ठरली, तर हैदराबाद आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. आता प्ले-ऑफच्या उरलेल्या 3 जागांसाठी 6 टीममध्ये चुरस आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातला सामना (KKR vs PBKS) फक्त या दोन टीमसाठीच नाही तर मुंबई इंडियन्ससाठीही (Mumbai Indians) महत्त्वाचा आहे. कोलकात्याविरुद्धच्या या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता चौथ्या, मुंबई पाचव्या आणि पंजाब सहाव्या क्रमांकावर आहे. कोलकात्याने 11 पैकी 5 मॅच जिंकल्या तर 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे मुंबईनेही कोलकात्याएवढ्याच मॅच खेळल्या आणि जिंकल्या असल्या तरी नेट रनरेटमुळे ते पिछाडीवर आहेत. दोन्ही टीमकडे प्रत्येकी 10-10 पॉईंट्स आहेत. पंजाबच्या टीमने 11 पैकी 4 मॅच जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा विजय मुंबईसाठी फायद्याचा ठरेल. पंजाबचा या सामन्यात विजय झाला तर ते पाचव्या आणि मुंबई सहाव्या क्रमांकावर जाईल, तरीदेखील पॉईंट्स टेबलचं गणित बघितलं तर मुंबईसाठी पंजाब जिंकणं महत्त्वाचं आहे. आजच्या सामन्यात पंजाबचा विजय झाला तर त्यांचे 12 सामन्यात 5 विजयांसह 10 पॉईंट्स होतील. म्हणजेच ते पॉईंट्सच्या बाबतीत मुंबईसोबत येतील, पण त्यांच्या हातात फक्त दोन मॅच उरतील. तर दुसरीकडे मुंबईकडे अजूनही पंजाबपेक्षा एक जास्त मॅच हातात राहिल, ज्याचा फायदा त्यांना उचलता येऊ शकतो. कोलकात्याचा विजय झाला तर मात्र मुंबईसाठी हा मोठा धक्का असेल, कारण मग कोलकात्याच्या खात्यात 12 पॉईंट्स जातील. त्यामुळे दोन्ही टीमच्या पॉईंट्समध्ये दोनचा फरक येईल. प्ले-ऑफचं गणित काय? कोलकात्याची टीम पंजाब, हैदराबाद (SRH) आणि राजस्थानविरुद्ध (Rajasthan Royals) खेळणार आहे, तर मुंबईचे सामने दिल्ली, राजस्थान आणि हैदराबादविरुद्ध होणार आहेत. या परिस्थितीमध्ये मुंबईची अपेक्षा पंजाब, हैदराबाद किंवा राजस्थानने कोलकात्याचा पराभव करावा अशीच असेल, ज्यामुळे प्ले-ऑफचे दरवाजे मुंबई इंडियन्ससाठी उघडू शकतात. या गोष्टी मुंबईच्या हातात नसल्या तरी आपले उरलेले तिन्ही सामने जिंकूनही मुंबईला प्ले-ऑफमध्ये पोहोचता येईल. दुसरीकडे कोलकात्याने उरलेल्या तीनपैकी एकही सामना गमावला नाही, तर मात्र मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न भंगू शकतं.
  Published by:Shreyas
  First published: