मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, KKR vs PBKS : कोलकाता अखेर 'जितबो रे', पंजाबला धूळ चारली

IPL 2021, KKR vs PBKS : कोलकाता अखेर 'जितबो रे', पंजाबला धूळ चारली

रॉयल चॅलेंजर्सनं दिलेल्या 92 धावांचे माफक आव्हान कोलकाताने अवघ्या 10 ओव्हरर्समध्ये 94 धावांमध्ये पूर्ण केले.

रॉयल चॅलेंजर्सनं दिलेल्या 92 धावांचे माफक आव्हान कोलकाताने अवघ्या 10 ओव्हरर्समध्ये 94 धावांमध्ये पूर्ण केले.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सना (KKR) सूर गवसला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या (PBKS) सामन्यात त्यांचा 5 विकेटने विजय झाला आहे.

  • Published by:  Shreyas

अहमदाबाद, 26 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सना (KKR) सूर गवसला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या (PBKS) सामन्यात त्यांचा 5 विकेटने विजय झाला आहे. पंजाबने दिलेल्या 124 रनच्या आव्हानाचा पाठलाग कोलकात्याने 16.4 ओव्हरमध्ये केला. कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) नाबाद 47 रनची खेळी केली, तर राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) 41, आंद्रे रसेलने 10 आणि दिनेश कार्तिकने नाबाद 12 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. 17 रनवरच त्यांच्या 3 विकेट गेल्या होत्या. नितीश राणा आणि सुनिल नारायण 0 रनवर आऊट झाले, पण मॉर्गन आणि त्रिपाठीने त्यांना सावरलं. पंजाबकडून हेनरिक्स, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि दीपक हुडा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

त्याआधी पंजाब किंग्सची (Punjab Kings vs KKR) बॅटिंग पुन्हा एकदा गडगडली. कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकल्यावर पंजाबला बॅटिंगला बोलावलं, यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून फक्त 123 रनच करता आले. पंजाबकडून मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) सर्वाधिक 31 रन केले, तर क्रिस जॉर्डनने 18 बॉलमध्ये 30 रनची फटकेबाजी केली, प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर पॅट कमिन्स आणि सुनिल नारायण यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेता आल्या. शिवम मावी आणि वरुण चक्रवर्तीनेही 1-1 विकेट मिळवली. या सामन्यात कोलकात्याने टीममध्ये एकही बदल केला नाही, तर पंजाबच्या टीममध्ये फास्ट बॉलर क्रिस जॉर्डनला संधी मिळाली.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला कोलकात्याचा 6 सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे. तर पंजाबनेही 6 पैकी 2 मॅचच जिंकल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकात्याची टीम पाचव्या आणि पंजाबची टीम सहाव्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, KKR, Punjab kings