Home /News /sport /

IPL 2021 : KKR मध्ये आला 1293 रन देणारा बॉलर, 15 कोटींचा खेळाडू बाहेर!

IPL 2021 : KKR मध्ये आला 1293 रन देणारा बॉलर, 15 कोटींचा खेळाडू बाहेर!

कोलकात्याच्या टीममध्ये नवा खेळाडू

कोलकात्याच्या टीममध्ये नवा खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएल 2021 (IPL 2021) च्या उरलेल्या मोसमात खेळणार नाही. त्याच्याऐवजी कोलकाता नाईट रायडर्सनी (KKR) न्यूझीलंडच्या टीम साऊदीला (Tim Southee) टीममध्ये सामील केलं आहे.

    मुंबई, 26 ऑगस्ट : ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएल 2021 (IPL 2021) च्या उरलेल्या मोसमात खेळणार नाही. त्याच्याऐवजी कोलकाता नाईट रायडर्सनी (KKR) न्यूझीलंडच्या टीम साऊदीला (Tim Southee) टीममध्ये सामील केलं आहे. दोनवेळा आयपीएल चॅम्पियन झालेल्या कोलकात्याची यंदाच्या मोसमातली कामगिरी निराशाजनक झाली. 2 विजयासह इंग्लंडची टीम सातव्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सत्राचे सामने 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार पॅट कमिन्सच्या जागी केकेआरने टीम साऊदीची टीममध्ये निवड केली आहे. कमिन्सला केकेआरने 2019 च्या लिलावात 15.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. साऊदी याआधी चेन्नई सुपरकिंग्स, आरसीबी, मुंबई आणि राजस्थानकडून खेळला आहे. 40 आयपीएल सामन्यांमध्ये 8.73 च्या इकोनॉमी रेटने त्याने 1293 रन दिले आणि फक्त 28 विकेट घेतल्या. कमिन्सने कौटुंबिक कारणामुळे आयपीएलच्या उरलेल्या मोसमातून माघार घेतली आहे. 2019 मध्ये साऊदीची धुलाई न्यूझीलंडचा 32 वर्षांचा फास्ट बॉलर असलेला टीम साऊदी आयपीएलच्या 7 मोसमांमध्ये खेळला. याआधी तो 2019 सालच्या आयपीएलमध्ये खेळला, तेव्हा त्याने 3 मॅचमध्ये 13 च्या इकोनॉमी रेटने रन दिले आणि फक्त एकच विकेट घेतली. त्याने सर्वाधिक 11 मॅच 2016 साली खेळल्या आणि 9 विकेट घेतल्या. साऊदीने टी-20 क्रिकेटमध्ये 201 मॅच खेळून 224 विकेट घेतल्या, यात 2 वेळा 5 विकेटचा समावेश आहे. टीम साऊदी चांगली बॅटिंगही करू शकतो. 201 टी-20 मॅचमध्ये त्याने 814 रन केले आणि 2 अर्धशतकं लगावली. टी-20 मध्ये साऊदीने 60 फोर आणि 46 सिक्सही मारल्या आहेत, म्हणजेच त्याच्या नावावर 100 पेक्षा जास्त बाऊंड्री आहेत. टीम साऊदीने 79 टेस्टमध्ये 314 विकेट घेतल्या आहेत, यात 12 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि एकदा मॅचमध्ये 10 विकेटचा समावेश आहे. साऊदीने 143 वनडेमध्ये 190 विकेट आणि 83 टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 99 विकेट मिळवल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, KKR

    पुढील बातम्या