IPL ला कोरोनाचे ग्रहण, KKR च्या खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर

IPL ला कोरोनाचे ग्रहण, KKR च्या खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर

कोरोनाच्या आपत्तीतही आतापर्यंत बायो-बबलमध्ये (Bio-Bubble)सुरळीत सुरू असलेल्या आयपीएलच्या (IPL 2021) 14व्या सत्राला अखेर सोमवारी कोरोनाचं (Corona) ग्रहण लागलं. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीममधील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

  • Share this:

मुंबई, 4 मे : कोरोनाच्या आपत्तीतही आतापर्यंत बायो-बबलमध्ये (Bio-Bubble)सुरळीत सुरू असलेल्या आयपीएलच्या (IPL 2021) 14व्या सत्राला अखेर सोमवारी कोरोनाचं(Corona)ग्रहण लागलं. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीममधील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. क्रिकेट टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं (BCCI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील स्पर्धेचा 30वा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 4 मे रोजी बीसीसीआयने या वर्षीची स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचं जाहीर केलं. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंनी परत जाण्याचा निर्णय घेतल्यानं काहीशी अनिश्चितता निर्माण झाली होती. यानंतर स्पर्धा सुरू ठेवण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं; पण बीसीसीआयनं स्पर्धा सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्याकरता पुढचे सामने मुंबईत घेण्याची तयारीही सुरू करण्यात आली होती. अर्थात आता स्पर्धेचे वेळापत्रक पुढं जाणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं होतं. पण त्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आयपीएल स्पर्धेचा 14 वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचं जाहीर केलं.

कोलकाता नाईट रायडर्ससाठी सोमवार घातवार ठरला. टीममधील वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) या क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली, तर अन्य एक खेळाडू शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) याच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेल्डनच्या काकूचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकीकडे त्याचे दोन सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर त्याच्या एका जिवलग व्यक्तीलाही त्यानं गमावलं.

शेल्डननं ट्विटरवर ही माहिती दिली. ‘आज संध्याकाळी मी माझ्या काकूला गमावले. या हंगामात माझी कोलकातासाठी निवड झाली तेव्हा ती सर्वात आनंदी व्यक्ती होती. म्हणूनच मी टीमच्या वतीने खेळत राहीन. या कठीण काळात ज्यांनी मला मदत केली, माझ्या काकुला वाचविण्याचा त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले त्या सर्वांचा ऋणी आहे. तिच्या आत्म्याला शांती लाभो.’ असं त्यानं म्हटलं आहे.

First published: May 4, 2021, 8:54 PM IST

ताज्या बातम्या