Home /News /sport /

IPL 2021 : KKR परदेशी लीगमधल्या आणखी दोन टीम विकत घेणार!

IPL 2021 : KKR परदेशी लीगमधल्या आणखी दोन टीम विकत घेणार!

जगातली सगळ्यातम मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलला (IPL) 9 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. पण दोन वेळची चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे.

    मुंबई, 20 एप्रिल : जगातली सगळ्यातम मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलला (IPL) 9 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. पण दोन वेळची चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पहिल्या तीन पैकी दोन सामन्यांमध्ये टीमचा पराभव झाला. आता 21 तारखेला केकेआर चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध (CSK) खेळेल. केकेआरने 2012 आणि 2014 साली गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नेतृत्वात आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं, यानंतर मात्र त्यांना यश आलं नाही. कोलकात्याच्या टीमने आयपीएलशिवाय कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही (CPL) एक टीम विकत घेतली आहे. त्रिनबागो नाईट रायडर्स (Trinbago Knight Riders) असं या टीमचं नाव आहे. मागच्या 6 मोसमांपैकी 4 वेळा त्रिनबागोने सीपीएल जिंकली आहे. सुनील नारायण (Sunil Narine) आणि प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅक्कलम (Brandon Mccullum) दोन्ही टीमसोबत आहेत. भारत आणि वेस्ट इंडिजनंतर आता केकेआर दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि अमेरिकेतल्या (America) टीमही विकत घेणार आहे. टीमचे सीईओ वेंकी मैसूर बीबीसीशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेत सुरू होणाऱ्या नव्या टी-20 लीगमध्ये एक टीम विकत घ्यायची आमची योजना आहे. याशिवाय अमेरिकेतल्या मार्केटवरही आमची नजर आहे, असं मैसूर म्हणाले. अमेरिकेच्या मेजर क्रिकेट लीगमध्ये केकेआरने समभाग खरेदी केला आहे. या लीगची सुरुवात पुढच्या वर्षी होणार आहे. केपटाऊन नाईट रायडर्स आणि लॉस एंजेलिस नाईट रायडर्स या दोन टीम आपण बनवणार असल्याचं, वेंकी मैसूर यांनी सांगितलं. द हंड्रेड बाबतही चर्चा इंग्लंड क्रिकेट बोर्ड यावर्षी जुलै महिन्यात द हंड्रेड या स्पर्धेची सुरुवात करत आहे, या लीगमध्ये जगातले मोठे खेळाडू सहभागी होणार आहेत. याबाबत इसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली, पण ते वैयक्तिक गुंतवणुकीसाठी तयार नसल्याचं वैंकी मैसूर म्हणाले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या