मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : KKR मध्ये सारं काही आलबेल नाही? कॅप्टनच्या निर्णयावर कोच नाराज

IPL 2021 : KKR मध्ये सारं काही आलबेल नाही? कॅप्टनच्या निर्णयावर कोच नाराज

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) कामगिरी निराशाजनक झाली आहे. यानंतर टीमचा मुख्य प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅक्कलमने (Brendon Mccullum) कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 19 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) कामगिरी निराशाजनक झाली आहे. तीन पैकी दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. यानंतर आता पुढच्या मॅचसाठी टीममध्ये बदल केले जातील, असं वक्तव्य टीमचे मुख्य प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅक्कलमने (Brendon Mccullum) केलं आहे. टीम आणि मैदान बदलल्यामुळे निकालही बदलेल, अशी अपेक्षा मॅक्कलमने व्यक्त केली आहे. केकेआरने त्यांच्या पहिल्या तिन्ही मॅच चेन्नईमध्ये खेळल्या. आता 21 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये त्यांचा मुकाबला तीन वेळची चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ससोबत (CSK) होणार आहे. कोलकात्याने आतापर्यंत दोनवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

'आम्हाला अशा खेळाडूची गरज आहे, जो ताजातवाना असेल. टीममध्ये काही बदल होतील, अशी अपेक्षा आहे. मुंबईमध्ये सामना असल्यामुळे ठिकाणही बदललं असेल. आम्हाला काही ठिकाणी सुधारणा करावी लागेल. पुढच्या दोन सामन्यांमध्ये आम्ही पुनरागमन करू शकतो', अशी प्रतिक्रिया मॅक्कलमने दिली. वरुण चक्रवर्तीने बँगलोरविरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या होत्या. पण कर्णधार मॉर्गनने (Eoin Morgan) त्याला बॉलिंगवरुन हटवलं, त्यावरुनही मॅक्कलमने नाराजी व्यक्त केली.

'वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy) बॉलिंगवरून हटवणं चूक होती. एबी डिव्हिलियर्सविरुद्ध (AB De Villiers) आम्हाला वरुणला वापरायचं होतं, पण आमची ही रणनिती फसली,' असं मॅकल्लमने कबूल केलं. एबी डिव्हिलियर्सने 76 नाबाद आणि मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) 78 रनच्या खेळीमुळे आरसीबीने केकेआरला 205 रनचं आव्हान दिलं. यानंतर आरसीबीच्या बॉलरनी केकेआरला 166 रनवर रोखलं.

'एबी डिव्हिलियर्स आमच्याविरुद्ध नवीन रणनिती घेऊन उतरला होता. आत्मविश्वासाने तो मैदानात उतरला. आमची मॅचवर पकड होती, पण एबीने सगळं हिरावून घेतलं. विश्वस्तरीय खेळाडू असंच करतात, ते विरोधी टीमवर दबाव टाकतात,' असं मॅक्कलमने सांगितलं, तसंच पुढच्या सामन्यात सुनिल नारायणला (Sunil Narine) संधी दिली जाऊ शकते, असे संकेतही त्याने दिले. केकेआरने पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये नारायणला खेळवलं नाही.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, KKR