मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : रबाडाचा फूलटॉस, 'युनिव्हर्स बॉस'लाही झेपला नाही, गेलच्या भन्नाट बोल्डचा Video

IPL 2021 : रबाडाचा फूलटॉस, 'युनिव्हर्स बॉस'लाही झेपला नाही, गेलच्या भन्नाट बोल्डचा Video

आयपीएलच्या (IPL 2021) पंजाब आणि दिल्ली यांच्या सामन्यात चाहत्यांना क्रिस गेल (Chris Gayle) आणि कागिसो रबाडा (Kagiso Rabada) यांच्यातला सामना बघायला मिळाला. या लढतीमध्ये अखेर कागिसो रबाडा विजयी झाला.

  • Published by:  Shreyas
अहमदाबाद, 2 मे : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) पंजाब किंग्सचा (Punjab Kings) संघर्ष सुरूच आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात (PBKS vs DC) त्यांचा 7 विकेटने पराभव झाला. पंजाबने दिलेलं 167 रनचं आव्हान दिल्लीने फक्त 17.4 ओव्हरमध्येच 3 विकेट गमावून पूर्ण केलं. शिखर धवनने 47 बॉलमध्ये नाबाद 69 रन केले. धवनसोबत आलेल्या पृथ्वी शॉनेही जलद 39 रन केले. या विजयासोबतच दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमघ्ये पहिल्या क्रमांकावर आणि पंजाब सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. केएल राहुल (KL Rahul) दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्याऐवजी मयंक अग्रवालकडे (Mayank Agarwal) टीमचं नेतृत्व देण्यात आलं. पंजाबची टीम जेव्हा मैदानात उतरली तेव्हा अनेकांना धक्का बसला. मयंक अग्रवालसोबत ओपनिंगला प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh) आला होता. टीममध्ये क्रिस गेल (Chris Gayle) आणि टी-20 क्रिकेटच्या क्रमवारीमधला नंबर एकवर असलेला डेव्हिड मलान (David Malan) यांच्यापैकी एक जण ओपनिंगला का आले नाहीत, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले, पण याचा काहीच फायदा झाला नाही, कारण मयंक वगळता पंजाबचे सगळे बॅट्समन अपयशी ठरले. पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीच्या कागिसो रबाडाने (Kagiso Rabada)सुरुवातीपासून पंजाबला धक्के दिले. कागिसो रबाडाने पहिले प्रभसिमरन आणि मग क्रिस गेलला आऊट केलं. रबाडाने घेतलेल्या गेलच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सहाव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला क्रिस गेलने रबाडाला सिक्स मारली, यानंतर रबाडाने पुढचाच बॉल 143.4 किमी प्रती तास या वेगाने टाकला. यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात रबाडाचा बॉल फूलटॉस पडला, पण गेललाही रबाडाने टाकलेला हा बॉल झेपला नाही आणि तो बोल्ड झाला. पहिल्या बॉलला सिक्स मारल्यानंतर रबाडा पुढचा बॉल बाऊन्सर टाकेल असं गेलला वाटलं होतं, त्यामुळे रबाडाचा बॉल टाकण्याआधीच गेल थोडा मागे फिरला होता, पण त्याचा अंदाज चुकला. 9 बॉलमध्ये 13 रन करून गेल पॅव्हेलियनमध्ये परतला. पंजाबकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक नाबाद 99 रन केले. 58 बॉलच्या या खेळीमध्ये 8 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. मयंक वगळता डेव्हिड मलानने 26 आणि प्रभसिमरनने 12 रन केले, ज्यामुळे पंजाबने दिल्लीला विजयासाठी 167 रनचं आव्हान दिलं. दिल्लीकडून रबाडाने 3 विकेट घेतल्या, तर आवेश खान आणि अक्षर पटेलला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
First published:

Tags: Chris gayle, Cricket, Delhi capitals, IPL 2021, Punjab kings

पुढील बातम्या