Home /News /sport /

IPL 2021 : धमाकेदार सुरुवातीनंतर घसरगुंडी का होते? या भारतीय खेळाडूवर भडकला गंभीर

IPL 2021 : धमाकेदार सुरुवातीनंतर घसरगुंडी का होते? या भारतीय खेळाडूवर भडकला गंभीर

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) अजून अर्ध्याही मॅच झालेल्या नाहीत, पण क्रिकेट चाहत्यांना काही उल्लेखनीय खेळी बघायला मिळाल्या. यातलीच एक खेळी म्हणजे राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) पंजाब किंग्सविरुद्ध (Punjab Kings) केलेलं वादळी शतक.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) अजून अर्ध्याही मॅच झालेल्या नाहीत, पण क्रिकेट चाहत्यांना काही उल्लेखनीय खेळी बघायला मिळाल्या. यातलीच एक खेळी म्हणजे राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) पंजाब किंग्सविरुद्ध (Punjab Kings) केलेलं वादळी शतक. संजू सॅमसनने 63 बॉलमध्ये 119 रन केले, यामध्ये 12 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. संजू सॅमसनच्या या खेळीनंतरही राजस्थानला पराभवाचा धक्का बसला. या अफलातून खेळीनंतर संजू सॅमसनचा फॉर्म ढासळला. पुढच्या तीन सामन्यांमध्ये संजूला संघर्ष करावा लागला, यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) संजू सॅमसनवर टीका केली आहे. संजू सॅमसन धमाकेदार सुरुवात करतो, पण जशी स्पर्धा पुढे जाते तशी त्याची घसरगुंडी होते, असं गंभीर म्हणाला आहे. गौतम गंभीरच्या आधी सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही संजू सॅमसनच्या सातत्य नसलेल्या कामगिरीवर टीका केली होती. बँगलोरविरुद्धच्या सामन्यात संजू 21 रन करून आऊट झाला होता, या सामन्यात बँगलोरचा 10 विकेटने विजय झाला. 'संजू सॅमसन धडाकेबाज सुरुवात करतो, तेव्हा तो आयपीएलमध्ये 800-900 रन करेल असं वाटतं, पण लगेच त्याची कामगिरी ढासळते. संजूने विराट आणि एबी डिव्हिलियर्सकडे बघावं,' असं गंभीर म्हणाला. 'त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. कामगिरीचा आलेख एवढा खाली-वरती असलेला चालणार नाही. तू शतक केलं असलं तरी पुढच्या सामन्यांमध्येही तू चांगली खेळी केली पाहिजे. एबी आणि विराटकडे बघा. शतक केल्यानंतर पुढच्या सामन्यांमध्ये ते 40 रन तरी करतात, पण संजू सॅमसनकडे बघितलं, तर तो शतक करतो आणि त्यानंतर काहीच करत नाही. जागतिक दर्जाचा खेळाडू असं खेळत नाही.' अशा कठोर शब्दांमध्ये गंभीरने सुनावलं. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्या गैरहजेरीत संजू सॅमसनने जास्त जबाबदारीने खेळलं पाहिजे. स्वत:ला सिद्ध करण्याची संजू सॅमसनकडे सुवर्णसंधी आहे. या संधीमुळे सॅमसन एकतर जबाबदार होईल किंवा त्याच्या करियरला उतरती कळा लागेल, असं मतही गंभीरने व्यक्त केलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Gautam gambhir, IPL 2021, Rajasthan Royals, Sanju samson

    पुढील बातम्या