मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा विजय, पण खूश झाला विराट कोहली, कारण...

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा विजय, पण खूश झाला विराट कोहली, कारण...

आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Rajasthan Royals) धमाकेदार विजय झाला. या सामन्यात मुंबईच्या इशान किशनने (Ishan Kishan) 25 बॉलमध्ये नाबाद 50 रनची खेळी केली.

  • Published by:  Shreyas

शारजाह, 6 ऑक्टोबर : आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Rajasthan Royals) धमाकेदार विजय झाला. या सामन्यात मुंबईच्या इशान किशनने (Ishan Kishan) 25 बॉलमध्ये नाबाद 50 रनची खेळी केली, यात 5 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. पहिले बॅटिंग करणाऱ्या राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 90 रन केले. इशान किशनच्या वादळी खेळीमुळे मुंबईने हे आव्हान 8.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्याआधी इशान किशनने आयपीएल 2021 मध्ये 8 मॅचमध्ये 107 रन केले होते. खराब फॉर्ममुळे त्याला मुंबई इंडियन्सने बाहेरही केलं होतं. टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) भारताने फक्त 6 स्पेशलिस्ट बॅट्समनची निवड केली आहे. यात मुंबई इंडियन्सच्या इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. या दोन्ही बॅट्समनसाठी आयपीएल 2021 निराशाजनक राहिली, पण सूर्यकुमार यादवही गेल्या 2 मॅचमधून फॉर्ममध्ये परतत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपआधी कर्णधार विराट कोहलीची चिंता मात्र मिटली आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये बदल करण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ उपलब्ध आहे. फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवनला टीममध्ये घेण्याची मागणी होत आहे. धवनने या आयपीएलमध्ये 13 सामन्यांमध्ये 501 रन केले. सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

इशान-सूर्यापैकी एक जण खेळणार

भारताकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा ओपनिंगला खेळतील हे निश्चित आहे. राहुलने लागोपाठ चौथ्या आयपीएलमध्ये 500 पेक्षा जास्त रन केले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विराट खेळेल, तर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येऊ शकतो. पाचव्या क्रमांकासाठी इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्यात स्पर्धा आहे. सूर्यकुमार यादवने 2018, 2019 आणि 2020 च्या आयपीएलमध्ये 400 पेक्षा अधिक रन केले. यावेळी मात्र युएईमधल्या आयपीएलमध्ये त्याला 6 मॅच खेळून 59 रनच करता आले आहेत.

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

स्टॅण्डबाय खेळाडू

श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

First published:

Tags: IPL 2021, Ishan kishan, Mumbai Indians, T20 world cup, Virat kohli